वाळव्यात नागनाथ अण्णा स्मारकात ‘जीवन दर्शन’ कामाचा आरंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:32 AM2021-09-08T04:32:57+5:302021-09-08T04:32:57+5:30
वाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णांच्या ऐतिहासिक स्मारकाचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने बांधकाम करण्यात आले आहे. यातील नागनाथ अण्णांच्या जीवन ...
वाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णांच्या ऐतिहासिक स्मारकाचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने बांधकाम करण्यात आले आहे. यातील नागनाथ अण्णांच्या जीवन दर्शनाच्या कामाची सुरुवात पुण्यातील डायरेक्टर आर्टिस्ट अभय येतावडेकर यांच्या हस्ते नागनाथ अण्णांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी वैभव नायकवडी म्हणाले, स्मारकामध्ये डॉ. नागनाथ अण्णांच्या जीवनातील ८० हून अधिक प्रसंग नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साकारले जाणार आहेत. हे जीवन दर्शन चरित्र नवीन पिढीसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल.
नागनाथ अण्णा व कुसुमताई नायकवडी यांच्या पुतळ्याचे माॅडेल तयार करण्याचे काम चंद्रजित यादव करीत आहेत. हे स्मारक पश्चिम महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पर्यटकांसाठी व नवीन पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. यावेळी बाबुराव बोरगावकर, स्थापत्य अभियंता व्ही.डी. वाजे, कारखान्याचे कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, सर्व संचालक, हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.