‘क्रांती’च्या कंपोस्ट खत विक्रीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:23 AM2020-12-23T04:23:22+5:302020-12-23T04:23:22+5:30

कारखाना कार्यक्षेत्रात सातत्याने बागायती पिकाचे उत्पादन घेतल्यामुळे जमिनीची सुपीकता घटत आहे. उत्पादनाच्या प्रमाणात रासायनिक खताबरोबर सेंद्रिय खतांचा वापर होताना ...

Commencement of sale of compost fertilizer of 'Kranti' | ‘क्रांती’च्या कंपोस्ट खत विक्रीस प्रारंभ

‘क्रांती’च्या कंपोस्ट खत विक्रीस प्रारंभ

googlenewsNext

कारखाना कार्यक्षेत्रात सातत्याने बागायती पिकाचे उत्पादन घेतल्यामुळे जमिनीची सुपीकता घटत आहे. उत्पादनाच्या प्रमाणात रासायनिक खताबरोबर सेंद्रिय खतांचा वापर होताना दिसत नाही. त्याचप्रमाणे उत्तम प्रतीची सेंद्रिय खते योग्य किमतीत उपलब्ध होत नाहीत. ऊस शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर वाढवा म्हणून क्रांती कारखान्याच्‍या ऊसविकास योजनेतून अनेक उपक्रम राबिवले जात आहेत. यामध्ये ५० टक्के अनुदानावर ताग, धैच्या बियाणांचा पुरवठा करणे, गांडूळखत, जीवाणू खतांचा पुरवठा करणे आदी बाबींचा समावेश आहे, अशी माहिती ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांनी दिली.

यावेळी कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, संचालक संदीप पवार, आप्पासाहेब जाधव, जयराम कुंभार, शीतल बिरणाळे, जनसंपर्क अधिकारी वसंत लाड, शेती अधिकारी दिलीप पार्लेकर, विश्वजित पाटील, सागर पाटील यांच्यासह कंत्राटदार संपत लाड, किरण गावडे, सचिन घाटगे, माणिक पवार उपस्थित होते.

फोटो-२२पलुस०१

फोटो ओळ : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्‍याच्‍यावतीने क्रांती कंपोस्ट खताच्‍या विक्रीचा प्रारंभ उपाध्यक्ष उमेश जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title: Commencement of sale of compost fertilizer of 'Kranti'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.