नेलेॅ ते कापूसखेड रस्त्याच्या कामाचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:30 AM2021-09-14T04:30:43+5:302021-09-14T04:30:43+5:30
फोटो ओळ : नेलेॅ ते कापूसखेड रस्त्याच्या डांबरीकरण काँक्रिटीकरण कामाचा प्रारंभ पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी ...
फोटो ओळ : नेलेॅ ते कापूसखेड रस्त्याच्या डांबरीकरण काँक्रिटीकरण कामाचा प्रारंभ पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, देवराज पाटील, संजय पाटील, संभाजी पाटील, सरपंच छाया रोकडे उपस्थित होते.
नेलेॅ : नेलेॅ ते कापूसखेड या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ पालकमंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
नेलेॅ ते कापूसखेड इस्लामपूर हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. या रस्त्याची दुरवस्था झाली होती. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या सहकार्याने या रस्त्यासाठी पहिल्या टप्प्यात दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित रस्त्याचे काम हे दुसऱ्या टप्प्यात पूर्ण होणार आहे.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले की, नेलेॅ ते कापूसखेड रस्त्याचे मजबुतीने काम करण्यात येणार आहे. तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी प्रस्ताव दाखल करा. ऐतिहासिक दर्ग्याची सुधारणा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ. गावातील अंतर्गत पाईपलाईनचे काम करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
यावेळी संजय पाटील, ‘कृष्णा’चे संचालक संभाजी पाटील, सरपंच छाया रोकडे, उपसरपंच विश्वास पाटील, आप्पासाहेब कदम, माणिक पाटील, अनिल साळुंखे, सुभाष पाटील, दिलीप पाटील, वसंतराव पाटील, विलासराव पाटील, डी. आर. पाटील आदी उपस्थित होते.