पर्यावरण रक्षणाचा स्तुत्य उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:26 AM2021-04-16T04:26:47+5:302021-04-16T04:26:47+5:30

ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथे रक्षा विसर्जिन न करता ती खड्ड्यात टाकून वृक्षारोपण केले. यावेळी तुकाराम खटावकर, जितेंद्र पाटील, ...

Commendable initiative for environmental protection | पर्यावरण रक्षणाचा स्तुत्य उपक्रम

पर्यावरण रक्षणाचा स्तुत्य उपक्रम

Next

ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथे रक्षा विसर्जिन न करता ती खड्ड्यात टाकून वृक्षारोपण केले. यावेळी तुकाराम खटावकर, जितेंद्र पाटील, प्रसाद पाटील, संदीप पाटील, प्रमोद पाटील, कुमार गायकवाड, आबा गायकवाड आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

ऐतवडे बुद्रुक : पाण्याचे दिवसेंदिवस होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या रूढी-परंपरांना बगल द्या. एखाद्या मृत व्यक्तीची रक्षा ही परंपरेप्रमाणे रक्षा विसर्जनावेळी पाण्यात न टाकता शेतातील खड्ड्यात टाकून त्यामध्ये वृक्ष लावा आणि पर्यावरणाचा समतोल साधा. जलप्रदूषण टाळण्याबरोबरच वृक्षसंवर्धनाची कास धरून पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे, असे असे आवाहन अधीक्षक अभियंता प्रकाश पाटील यांनी केले.

ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथे ऑगस्ट २०१३ पासून सन्मती संस्कार मंचने नवा पायंडा पाडला. आजअखेर सुमारे ६० ते ७० लोकांची रक्षा त्यांच्या कुटुंबियांनी ‘मरावे परी वृक्षरूपी उरावे’च्या माध्यमातून आपापल्या शेतात खड्ड्यात टाकून त्यात वृक्षारोपण केले आहे. हा स्तुत्य उपक्रम आहे. दु:खदप्रसंगीसुध्दा समाजामध्ये दिशादायी असा नवा पायंडा शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मातृभूमीत सन्मतीने रुजवला. यामध्ये सातत्य ठेवा. बहुतांशीवेळा वाहत्या नदी-ओढ्यांमध्ये रक्षा विसर्जन करून जलप्रदूषणाचा धोका अंत्यसंस्कार रक्षा विसर्जनाच्या मातीमुळे याआधी वर्षानुवर्षे निर्माण झाला आहे, असे अधीक्षक अभियंता पाटील यांनी सांगितले.

यावेळी माजी उपसरपंच तुकाराम खटावकर, प्रसाद पाटील, विनय कोरे पाणीपुरवठा संस्थेचे संचालक संदीप पाटील, सर्प व वृक्षप्रेमी कुमार गायकवाड, सन्मती संस्कार मंचचे जितेंद्र पाटील, महावीर बुद्रुक, डॉ. कुबेर पाटील, सेवा सोसायटीचे संचालक प्रमोद पाटील, आबा गायकवाड उपस्थित होते.

Web Title: Commendable initiative for environmental protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.