सांगलीत मृत कोविड कर्मचार्यांच्या कुटूंबियांना आयुक्तांकडून भाऊबीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:55 AM2020-11-19T11:55:28+5:302020-11-19T11:57:16+5:30
diwali, Muncipal Corporation, commissioner, Sangli सर्वत्र दिवाळीचा सण मोठा उत्साहात साजरा होत असताना सांगली महापालिकेच्या कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या घरात मात्र सन्नाटा होता. घरातील कर्ता पुरुष गेल्याने या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशा प्रसंगी कुटूंबांना दिलासा देण्याचे काम महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले. आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासोबत सण साजरा करत भाऊबीजेची ओवाळणी दिली. यामुळे कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय गहिवरून गेले होते.
सांगली : सर्वत्र दिवाळीचा सण मोठा उत्साहात साजरा होत असताना सांगली महापालिकेच्या कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या घरात मात्र सन्नाटा होता. घरातील कर्ता पुरुष गेल्याने या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशा प्रसंगी कुटूंबांना दिलासा देण्याचे काम महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले. आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासोबत सण साजरा करत भाऊबीजेची ओवाळणी दिली. यामुळे कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय गहिवरून गेले होते.
कोरोनाच्या संसर्गात गेली आठ महिने महापालिकेची कर्मचारी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावित आहेत. कोरोनाबाधितांचा शोध घेण्यापासून ते मृत कोविड रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यापर्यंत सारी जबाबदारी कर्मचार्यांनी पार पाडली आहे. अशातच महापालिकेच्या अनेक अधिकारी, कर्मचार्यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. यात १० कर्मचार्यांचा कोरोनाने बळी घेतला.
यंदा या कर्मचाऱ्याच्या घरी दिवाळी साजरी झाली नाही. कर्ता माणूस हिरावल्याने या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या कुटूंबियांना दिलासा देण्याचे काम आयुक्त कापडणीस व उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले. भाऊबीजेच्या दिवशी त्यांनी या कुटूंबाला भेट दिली. त्यांच्यासोबत भाऊबीज आणि दिवाळी साजरी केली. आम्ही आपल्या सोबत आहोत असा धीर दिला. आयुक्तांनी दिलेल्या आधारामुळे महापालिका कर्मचाऱ्याचे कुटुंब भारावून गेले.