‘नमराह’च्या पवित्र कार्याला समाजाची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:20 AM2021-05-29T04:20:21+5:302021-05-29T04:20:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : नमराह म्हणजे पवित्र... तसेच काहीसे काम या नावाने स्थापन झालेल्या फाऊंडेशनकडून गेल्या वर्षभरापासून विविध ...

Community support for the sacred work of 'Namarah' | ‘नमराह’च्या पवित्र कार्याला समाजाची साथ

‘नमराह’च्या पवित्र कार्याला समाजाची साथ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : नमराह म्हणजे पवित्र... तसेच काहीसे काम या नावाने स्थापन झालेल्या फाऊंडेशनकडून गेल्या वर्षभरापासून विविध उपक्रम सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढताच नमराह फाऊंडेशनने समाजाप्रति असलेल्या कर्तव्याच्या जाणीवेतून कोविड सेंटर सुरू केले. आज हे कोविड सेंटर गोरगरीब रुग्णांसाठी संजीवनी ठरले आहे. एकीकडे खासगी रुग्णालयातील बिलांनी लाखोंच्या लाखो उड्डाणे घेतली असताना या सेंटरमध्ये अल्प दरात उपचार केले जात आहेत. शिवाय शैक्षणिक कार्यातही फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. कोविड मृतांवर दफन विधीचे काम फाऊंडेशनची यंग ब्रिगेड करीत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत रहिम मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी नमराह फाऊंडेशनची स्थापना केली. समाजातील गोरगरिबांना मदतीचा हात देण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला. समाजातील दानशूर लोकांच्या मदतीचा फायदा गोरगरिबांना करून दिला. पहिल्या लाटेत शिंदे मळ्यातील महापालिकेच्या उर्दु शाळेत कोविड केअर सेंटर सुरू केले. हे सेंटर दोन महिने चालविले. त्यानंतर कोरोनाची लाट ओसरताच शैक्षणिक कार्यात पुढाकार घेतला. शिंदे मळ्यातील उर्दु शाळा फाऊंडेशनने दत्तक घेतली. खासगी शाळेच्या धर्तीवर एक माॅडेल स्कूल बनविण्याचा प्रयत्न सुरू केला. शहरातील नामवंत व्यक्तिंना शाळेत बोलावून त्यांच्याकडून सूचना घेतल्या. तोपर्यंत कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली.

गतवर्षी कोविड केअर सेंटरचा अनुभव गाठीशी होता. त्यामुळे दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांवर अल्पदरात उपचार करण्यासाठी डेडीकेटेड सेंटर सुरू करण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली. दहा ऑक्सिजन बेडचे रुग्णालयच शाळेत सुरू केले. आतापर्यंत ५३ रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आले आहे. एकीकडे खासगी रुग्णालयात कोरोना उपचारासाठी लाखो रुपयांची बिले आकारली जात असताना फाऊंडेशनने मात्र अल्पदरात उपचार करून नवा आदर्श निर्माण केला आहे.

कोरोना मृतांवर दफन करण्यासाठी नातेवाईक पुढे सरसावत नाहीत, अशा काळात फाऊंडेशनच्या इर्शाद सोलापुरे यांच्यासह तरुण कार्यकर्ते दफनविधी करीत आहेत. जात, पात न पाहता ही यंग बिग्रेड पवित्र कामात पुढाकार घेत आहे. या साऱ्या कामात नगरसेवक संतोष पाटील यांची मोलाची साथ लाभत आहे.

चौकट

‘प्राणवायु दाता’ संकल्पना

नमराह फाऊंडेशनने प्राणवायु दाता ही नवी संकल्पना राबविली आहे. कोविड सेंटरसाठी आवश्यक ऑक्सिजनचा खर्च दानशूर व्यक्ती, संघटनांकडून देणगी स्वरुपात घेतला जातो. ऑक्सिजन पुरवठ्याचा खर्चाचा भार रुग्णावर पडत नाही. आता फॅमीफ्लूच्या गोळ्यांचा साठाही एका कंपनीकडून मिळणार आहे. त्यामुळे एका रुग्णांचे किमान पाच हजार रुपये वाचणार आहेत.

Web Title: Community support for the sacred work of 'Namarah'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.