पुणे बेंगलोर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 20:15 IST2023-07-28T20:15:33+5:302023-07-28T20:15:43+5:30
या वाहतूक कोंडीमुळे बसमधून प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थी व प्रवाशांना रात्री उशिरा घरी जावे लागले होते.

पुणे बेंगलोर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका
रेठरे धरण:- शुक्रवारी दिवसभर व संध्याकाळी पुणे बेंगलोर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला, कराड ते नांदलापूर हा चार किलोमीटरचा प्रवास करायला, वाहनांना तास ते सव्वा तासाचा अवधी लागला, त्यामुळे वांधारावर प्रवासी फारच वैतागून गेले होते.
पुणे बंगलूरु महामार्गावर कागल ते शेंद्रे सातारा या रस्त्याचे सहा पदरीकरण तसेच तसेच कराड येथील नांदलापूर ते कराड या उड्डाण पुलाचे काम सुरू असून, मामा मार्गाचे पूर्व पश्चिम बाजूने प्रत्येकी दोन लेनवर वाहतूक सुरू असून, दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे व रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असुन, या रस्त्याने कराड कडून कोल्हापूरकडे व कोल्हापूरकडून साताराकडे जाणाऱ्या वाहनधारकांची, वाहतूक कोंडीमुळे,खुप कुचंबना झाली, याचा सर्व वांधारकांना व प्रवाशांना वेळेचा मोठा फटका बसला आहे.
- पुणे बंगलुरु महामार्गावरील उड्डाणपुलाचे कराड येथे काम सुरू असल्याने, दोन्ही बाजूच्या सर्विस रस्त्यांची खड्डे पडून दुरावस्था झाल्याने, तसेच उलट्या दिशेने प्रवास करणाऱ्या दुचाकी वाहनांच्यामुळे, व बंद पडलेल्या वाहनांच्यामुळे, वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण झाली होती, या वाहतूक कोंडीमुळे बसमधून प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थी व प्रवाशांना रात्री उशिरा घरी जावे लागले होते.