पुराची नुकसान भरपाई द्या, मग वीज बिल देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:31 AM2021-09-24T04:31:52+5:302021-09-24T04:31:52+5:30
भिलवडी : जोपर्यंत महापुराच्या नुकसान भरपाईचे पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत वीज बिल भरणार नाही, अशा आशयाचे निवेदन भिलवडी ...
भिलवडी : जोपर्यंत महापुराच्या नुकसान भरपाईचे पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत वीज बिल भरणार नाही, अशा आशयाचे निवेदन भिलवडी व्यापारी संघटनेच्यावतीने महावितरणला देण्यात आले.
थकीत वीजबिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्यात येईल अशा सूचना महावितरणने दिल्या आहेत. कोरोनामुळे असलेली टाळेबंदी व वारंवार येणारा महापूर यामुळे कृष्णाकाठचा व्यापारी उद्ध्वस्त झाला आहे. सानुग्रह अनुदान आणि व्यापाऱ्यांना शासनाने अद्यापही नुकसान भरपाई दिलेली नाही. नुकसान भरपाई मिळाल्यावर आम्ही थकीत वीजबिले भरू. तोपर्यंत पंधरा दिवसांची मुदत वाढ द्यावी, अशी मागणीही लेखी निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
भिलवडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील, दिलीप कोरे, दीपक पाटील, अशोक जाधव, दादा सावंत, दिलीप पाटील, बशीर अत्तार, रोहित भोकरे आदी उपस्थित होते.