वाळव्यात सीईओंपुढे तक्रारींचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:36 AM2021-06-16T04:36:54+5:302021-06-16T04:36:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाळवा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी येथील विलगीकरण कक्षाला सोमवारी भेट दिली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी येथील विलगीकरण कक्षाला सोमवारी भेट दिली. कक्ष सुरू होऊन वीस दिवस झाले तरी सरपंच डॉ. शुभांगी माळी, गावकामगार तलाठी एस. सुदेवाड यांनी कधीही भेट दिली नसल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे तालुका उपाध्यक्ष धनाजी शिंदे यांनी केली.
वाळवा विलगीकरण कक्षाला पालकमंत्री जयंत पाटील, प्रतीक पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सहकार्य केले आहे. येथील बेड, स्वच्छता, ऑक्सिजन याबद्दल डुडी यांनी समाधान व्यक्त केले. वाळव्यात एकच कोरोना विलगीकरण कक्ष आहे, परंतु माळावर दुसरे सुरू केले असल्याचे सांगून डुडी यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीच्या सताधाऱ्यांनी करून त्यांना भेट देण्यासाठी विनंती केली असता भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष विक्रम शिंदे यांनी आक्षेप घेतला. यावेळी ग्रामपंचायतीतील सत्ताधारी आणि राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजप व मनसे कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमक उडाली. काँग्रेसचे शहराध्यक्ष अक्षय फाटक, मनसे विभाग अध्यक्ष सचिन कदम, राजीव गावडे, राष्ट्रवादीचे रवींद्र खवरे, चंद्रकांत ओतारी प्रमुख उपस्थित होते.