समाजकल्याण अधिकारी कवले यांच्याविरोधात तक्रार

By Admin | Published: July 8, 2015 11:49 PM2015-07-08T23:49:34+5:302015-07-08T23:49:34+5:30

अधिकाऱ्यांत अस्वस्थता : धुसफूस सुरूच

Complaint against social welfare officer Kawale | समाजकल्याण अधिकारी कवले यांच्याविरोधात तक्रार

समाजकल्याण अधिकारी कवले यांच्याविरोधात तक्रार

googlenewsNext

सांगली : शासकीय कामकाजाकडे दुर्लक्ष, वरिष्ठांचे आदेश पाळले जात नसल्याचा ठपका ठेवून जिल्हा समाजकल्याण अधिकारी सचिन कवले यांच्याविरोधात समाजकल्याण आयुक्तांकडे जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे. यामुळे जिल्ह्यातील विकास कामांऐवजी अधिकाऱ्यांमध्ये मतभेदच टोकाला गेल्यामुळे खातेप्रमुखांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
आठ दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी खरडपट्टी काढल्यानंतर जिल्हा परिषदेतील खातेप्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कारभार सुरळीत चालू असल्याचे दिसत होते. परंतु, काही दिवसांपूर्वी जिल्हा समाजकल्याण अधिकारी कवले यांच्याविरोधातील प्रस्तावामध्ये त्यांच्या बदलीचाही उल्लेख आहे. तसेच समाजकल्याण विभागातील त्या वादग्रस्त महिलेच्याही कारभारात सुधारणा झाल्या नाहीत. कवले यांना त्या महिलेकडून माहिती दिली जात नसल्याच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी आहेत. आता मुख्य कार्यकारी अधिकारी काय निर्णय घेणार, याबाबत जिल्हा परिषद वर्तुळात चर्चा आहे. (वार्ताहर)

‘सीईओं’कडून खरडपट्टी
आठ दिवसांपूर्वी जिल्हा समाजकल्याण अधिकारी कवले यांना नाहक त्रास दिल्यावरून चांगलाच वाद रंगला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली होती. कार्यालयीन कामकाज सोडून व्यक्तिगत मतभेद चव्हाट्यावर मांडू नका, असे सुनावले होते. यापुढे अशा तक्रारी माझ्या कानावर आल्या, तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही लोखंडे यांनी दिला होता.

Web Title: Complaint against social welfare officer Kawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.