महापालिकेतील घोटाळ्याची राज्यपालांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:31 AM2021-01-08T05:31:38+5:302021-01-08T05:31:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या आतापर्यंत झालेल्या लेखापरीक्षणातून दीड हजार कोटी रुपयांचा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे. परंतु ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या आतापर्यंत झालेल्या लेखापरीक्षणातून दीड हजार कोटी रुपयांचा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे. परंतु शासन पातळीवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लक्ष घालून शासनास कारवाई करण्यास भाग पाडावे, अशी मागणी नागरिक हक्क संघटनेचे कार्यवाह वि. द. बर्वे यांनी निवेदनाद्वारे केली.
बर्वे म्हणाले, महापालिकेतील गैरकारभाराबद्दल आम्ही वर्षानुवर्षे लढा देत राहिलो. यातून चार विशेष लेखापरीक्षणे झाली. त्यात दीड हजार कोटी रुपयांचे गैरकारभार चव्हाट्यावर आले. त्याप्रकरणी भार-अधिकारही लागला आहे. वास्तविक याप्रकरणी न्यायालयाने शासन, महापालिकेला कारवाई व वसुलीचे आदेश देऊनही कार्यवाही होत नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात अवमान याचिका दाखल करूनही कारवाई झाली नाही.
वास्तविक महापालिकेत एकहाती भाजपची सत्ता आहे. परंतु अडीच-तीन वर्षांत पाठपुरावा करूनही संबंधितांवर कारवाई होत नाही. त्याची वसुली लागत नाही. उलट नव्याने गैरकारभारामुळे भाजपची बदनामी सुरूच आहे. त्यासाठी तत्काळ गैरकारभाराबाबत चौकशी करून कारवाई करावी, शासनामार्फत त्याची अंमलबजावणी करावी. ४३ नगरसेवकांपैकी चारच मूळ भाजपचे आहेत. उद्या सत्ता बदल झाला की ते परत जातील. मात्र बदनामीला भाजपलाच सामोरे जावे लागणार आहे, असेही ते म्हणाले.