मिरजेत शाळा व्यवस्थापनाकडून पालकांच्या छळाची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:29 AM2021-02-24T04:29:23+5:302021-02-24T04:29:23+5:30

ओळ : मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना घेरावो घालत मागण्यांचे निवेदन दिले. मिरज : ऑनलाईन ...

Complaint of harassment of parents by Miraj school management | मिरजेत शाळा व्यवस्थापनाकडून पालकांच्या छळाची तक्रार

मिरजेत शाळा व्यवस्थापनाकडून पालकांच्या छळाची तक्रार

Next

ओळ : मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना घेरावो घालत मागण्यांचे निवेदन दिले.

मिरज : ऑनलाईन परीक्षेच्या उत्तरपत्रिका शाळेत जमा करताना फी भरल्याशिवाय उत्तरपत्रिका न घेण्याचा शाळांचा पावित्रा व शाळा व्यवस्थापनाकडून पालकांना अपमानास्पद वागणूक थांबवा, या मागणीसाठी मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना घेरावो घालत संबंधित शाळा व्यवस्थापनांवर कारवाईची मागणी केली.

सुधार समिती कार्यकर्त्यांसह इंग्रजी शाळातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मंगळवारी महापालिका शिक्षण मंडळाचे वरिष्ठ लिपिक श्रीकांत भोई व जि. प. प्राथमिक उपशिक्षणाधिकारी एस. एम. धोत्रे यांना कार्यालयात जाऊन घेराव घातला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गतवर्षी लॉकडाऊन काळात व नंतरही कोरोनामुळे अनेक प्राथमिक शाळा बंद आहेत. काही शाळांनी केवळ पाऊणतास ऑनलाईन शिक्षण देत गेल्या वर्षभराची फी भरण्याची सक्ती केली आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसायाला फटका बसल्याने अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. काहींना निम्मा पगार मिळत असल्याने सामान्य पालक आर्थिक कोंडीत आहेत. सर्वच खासगी शाळा पालकांना फी भरण्याची सक्ती करत आहेत. फी भरल्याशिवाय ऑनलाईन परीक्षांच्या उत्तरपत्रिका स्वीकारण्यास नकार देत पालकांशी अपमानास्पद वर्तन करण्यात येत असल्याची तक्रार आहे. याविरोधात शहर सुधार समितीतर्फे संबंधित शाळेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी शहर सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष जावेद पटेल, बाळासाहेब पाटील, गीतांजली पाटील, राकेश तामगावे, मुस्तफा बुजरूक, संतोष माने, जहीर मुजावर, शंकर परदेशी, सचिन गाडवे, रुपाली गाडवे, झोहेब मुल्ला, नयूम नदाफ उपस्थित होते.

Web Title: Complaint of harassment of parents by Miraj school management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.