संजयनगरमधील भूखंडाबाबत मंत्र्यांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:22 AM2021-01-14T04:22:30+5:302021-01-14T04:22:30+5:30
संजयनगर : आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटनेकडून महापालिकेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना महापालिकेच्या खुल्या भूखंडाबाबत प्रा. मिलिंद ...
संजयनगर : आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटनेकडून महापालिकेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना महापालिकेच्या खुल्या भूखंडाबाबत प्रा. मिलिंद साबळे यांनी निवेदन दिले. याप्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
संजयनगरमधील प्रभाग क्रमांक ११ मधील रूक्मिणी हाऊसिंग सोसायटी परिसरातील जनतेसाठी भूखंड खुला ठेवला होता. परंतु, सन २०१४मध्ये येथील भूखंड एका व्यक्तीला विकल्याचे दिसून येत आहे. हा भूखंड सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेचा आहे. भूखंड हडप करण्याचा उद्योग सुरु असून, हा प्लॉट महापालिकेचा असल्याने त्याठिकाणी महापालिकेचा फलक लावावा आणि प्लॉट विकणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या निवेदनातून केली आहे. यावेळी समाधान लोंढे, राजन चव्हाण, सुधीर आवळे, राजू कागवाडे आदी उपस्थित होते.
कोट
२०१४मध्ये रुक्मिणी हाऊसिंग सोसायटीमधील प्लॉट मूळ मालकाच्या नावे होता. तो भूखंड त्यांनी दुसऱ्या व्यक्तीला विकला आहे. महापालिकेने या कालावधीमध्ये त्या भूखंडावर आपले नाव लावले नाही. हा महापालिकेचा हलगर्जीपणा आहे.
- कांचन कांबळे, माजी महापौर