सांगलीत वन अधिकाऱ्यांच्या अतिक्रमणाबद्दल तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:27 AM2021-03-05T04:27:04+5:302021-03-05T04:27:04+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगलीतील सावंत प्लॉट येथे आरक्षित भूखंडावर वन अधिकारी वैभव विलास शिंदे यांनी अतिक्रमण करून ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगलीतील सावंत प्लॉट येथे आरक्षित भूखंडावर वन अधिकारी वैभव विलास शिंदे यांनी अतिक्रमण करून बंगला बांधला आहे, अशी तक्रार सांगली जिल्हा निवारा संघाने सांगली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे दाखल केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात संघाचे अध्यक्ष कॉ. शंकर पुजारी यांनी म्हटले आहे की, सांगलीतील मंगलमूर्ती कॉलनीतील पश्चिम बाजूस शंभर फुटी रोड ते चिले माउली गिरणीपर्यंत सध्या रस्ताच अस्तित्वात नाही. त्यामुळे या रस्त्यावर गटार नसल्याने प्रचंड पाणी तुंबून दलदल निर्माण झालेली आहे. रस्ता मंजूर असून, रस्ता करण्याची वर्कऑर्डर दि. २६ एप्रिल २०१३ रोजी काढली आहे. परंतु रस्त्यावरच अतिक्रमण करून शिंदे यांनी बंगला बांधला आहे. त्यांची बाजू घेऊन सांगली महापालिका मंजूर रस्ता करण्यास तयार नाही. १८ डिसेंबर २०१८ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश धाब्यावर बसवून हे बांधकाम झाले आहे. म्हणून याची चौकशी झाली पाहिजे.
मंजुरीनुसार त्वरित रस्ता करावा. रस्ता न झाल्यास बेमुदत उपोषण करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.