आवंढी ग्रामपंचायत इमारतीच्या निकृष्ट बांधकामाबाबत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:40 AM2020-12-16T04:40:00+5:302020-12-16T04:40:00+5:30
शेगाव : आवंढी (ता. जत) येथे मंजूर नवीन ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम चालू आहे. बांधकाम करताना ओढा पात्रातील मातीमिश्रित वाळू ...
शेगाव : आवंढी (ता. जत) येथे मंजूर नवीन ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम चालू आहे. बांधकाम करताना ओढा पात्रातील मातीमिश्रित वाळू व कमी दर्जाच्या स्टीलचा वापर सुरू आहे. या कामाची गुणनियंत्रकामार्फत तपासणी करून कामाचा दर्जा तपासण्याची मागणी अंकुश शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बांधकाम पाहण्यासाठी इंजिनिअर व मुख्य ठेकेदार कामावर हजरच नसतात. ज्या ठेकेदाराने काम घेतले आहे, तो हे काम स्वत: न करता त्रयस्थ व्यक्तीस दिले आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच काम करत आहेत. कामाच्या गुणवत्तेची गुणनियंत्रकामार्फत तपासणी करावी. दोषी ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. तसेच या कामावर शासनाचे अभियंता अनुपस्थित असतात. त्यामुळे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. याप्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई करावी.