तासगाव आगार प्रमुखांविरोधात महिला वाहकांची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:36 AM2021-02-27T04:36:12+5:302021-02-27T04:36:12+5:30
निवेदनात म्हटले आहे की, महिला वाहकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. चालक-वाहकांना त्रास देऊन रजेचे अर्ज घेऊन गेले की कर्मचाऱ्यांशी ...
निवेदनात म्हटले आहे की, महिला वाहकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. चालक-वाहकांना त्रास देऊन रजेचे अर्ज घेऊन गेले की कर्मचाऱ्यांशी उद्धट भाषा बोलणे, रजा अर्ज न स्वीकारणे, ड्युटी सुरू होण्याच्या वेळेपासून गाडी दोन ते तीन तास उशिरा मिळते. यामुळेे ड्युटी संपण्यास रात्रीचे अकरा ते बारा वाजतात. त्यावेळेस कोणताही अधिकारीवर्ग हजर नसतो. त्यामुळे महिलांना अनेक अडचणी येतात. मात्र, महिला वाहकांची उद्धट वर्तणूक करून तासगाव आगाराच्या स्थानकप्रमुख यांचा मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे.
अशा परिस्थितीतही वाहकांना विनाकारण जाणीवपूर्वक मानसिक छळ करण्याचे प्रकार स्थानकप्रमुख यांच्याकडून सुरू असल्याची तक्रार कांबळे यांनी केले असून, कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
वाहक आरती भोसले, वैशाली सुतार, सुरेखा सुतार, अश्विनी कराळे, स्मिता जाधव, मनीषा घोडके, शोभा सुर्वे, वर्षा पाटील, सपना नंदीवाले, नंदा वारके, स्मिता पोतदार, सीमा पवार, शीतल कांबळे, कमल सूर्यवंशी, रागिनी जाधव, स्मिता तोडकर, अरुणा बनसोडे, स्वाती सरवदे यांनी निवेदन दिले.