सोशल मीडियाचा ‘सोसंल’ तेवढाच वापर न केल्याने वाढताहेत तक्रारी; बदनामीचे नवे कुरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:14 AM2020-12-28T04:14:51+5:302020-12-28T04:14:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ‘नको मित्रांची साथ नको गप्पांसाठी कट्टा, हवा फक्त सोशल मीडिया’ अशी काहीशी गत सध्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ‘नको मित्रांची साथ नको गप्पांसाठी कट्टा, हवा फक्त सोशल मीडिया’ अशी काहीशी गत सध्याच्या तरूणाईची झाली आहे. सोशल मीडियाचे आभासी जग अधिक प्रिय वाटू लागल्याने त्याचे दुष्परिणामही भोगावे लागत आहेत. मित्राशी अथवा मैत्रिणीशी वाद झाल्यास तिच्या बदनामीसाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे. याच पध्दतीच्या तक्रारी वाढत असून, सोशल मीडियाव्दारे बदनामी होणारे गुन्हे कमी करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
महिलांच्या बदनामीसाठी सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर केला जात असल्याचे पोलीस तपासात निष्षन्न झाले आहे. एखाद्या व्यक्तीविषयी एखादी आक्षेपार्ह पोस्ट लिहून न थांबता, तिचे फोटो ‘मॉर्फ’ करून ते प्रसारीत करणे, फोटोत बदल करून त्यात स्वत:चा फोटो लावण्यासह अन्य काही प्रकार होताना दिसतात. त्यामुळे स्थानिक पोलीस स्थानकासह सायबर पोलिसांकडे सोशल मीडियाव्दारे बदनामी होत असल्याच्या तक्रारींचे प्रमाण वाढत आहे.