काँग्रेस पदाधिकाºयांवर नगरसेवक नाराज नेत्यांकडे तक्रारी : महापालिकेत आज बैठक; नाराजी दूर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:23 AM2018-01-05T00:23:11+5:302018-01-05T00:23:56+5:30
सांगली : महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक स्वपक्षाच्या पदाधिकाºयांवर नाराज झाले आहेत. १५ हून अधिक नगरसेवकांनी पदाधिकाºयांच्या कारभाराबद्दल वरिष्ठ नेत्यांसमोर तक्रारींचा
सांगली : महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक स्वपक्षाच्या पदाधिकाºयांवर नाराज झाले आहेत. १५ हून अधिक नगरसेवकांनी पदाधिकाºयांच्या कारभाराबद्दल वरिष्ठ नेत्यांसमोर तक्रारींचा पाढा वाचला आहे. या तक्रारींची दखल काँग्रेस नेत्यांनी घेतली असून, नगरसेवकांची नाराजी दूर करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेत बैठक होत आहे.
महापालिकेच्या निवडणुका जून २०१८ मध्ये होणार आहेत. मात्र नगरसेवकांची बायनेमची कामे अद्याप मंजूर झाली नाहीत. आचारसंहिता साठ दिवस अगोदर लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभागातील विकासकामे दोन महिन्यात मार्गी लावणे आवश्यक आहे. आयुक्तांकडून विकासकामांना मान्यता मिळत नाही. महापौर-आयुक्त वाद असल्याने महापौरांनी सूचविलेल्या कामांना आयुक्त बेदखल करतात. गटनेते नगरसेवकांची कामे करत नाहीत. यामुळे कॉँग्रेसच्या बारा नगरसेवकांनी कॉँग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम व जयश्रीताई पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. महापालिकेत कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी घडी विस्कटली आहे.
नगरसेवकांची कामे मार्गी लावण्यासाठी पदाधिकाºयांकडून कोणतेच प्रयत्न केले जात नाहीत. यामुळे कॉँग्रेसच्या नेत्यांनी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना महापालिकेत बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारी सकाळी अकरा वाजता गटनेते किशोर जामदार यांच्या कार्यालयात नगरसेवकांची बैठक होणार आहे. या बैठकीत पदाधिकारी व नगरसेवकांची शहर जिल्हाध्यक्ष आढावा बैठक घेऊन मते जाणून घेणार आहेत. त्यानंतर डॉ. कदम, जयश्रीताई पाटील हे नगरसेवकांच्या बैठका घेण्याची शक्यता आहे.
कारणे अनेक; विकासकामांचा बोजवारा
काँग्रेस नगरसेवकांच्या नाराजीची अनेक कारणे आहेत. आयुक्तांसोबतच्या वादामुळे महापौरांचे ऐकले जात नाही. गटनेते, स्थायी समिती सभापतींचे आयुक्तांशी चांगले संबंध आहेत. पण ते स्वत:ची व मोजक्या नगरसेवकांचीच कामे करतात. इतर नगरसेवकांची कामे धूळ खात पडली आहेत. आयुक्त तर महापालिका मुख्यालयातच येत नाहीत. तरीही पदाधिकारी त्यांना जाब विचारत नाही. त्यामुळे विकासकामांचा बोजवारा उडाला असून, त्याचे खापर मात्र सत्ताधाºयांवर फोडले जात आहे, अशा तक्रारी नगरसेवक करीत आहेत.