घाटमाथ्यावर कोविड लसीकरणस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:22 AM2021-04-03T04:22:51+5:302021-04-03T04:22:51+5:30
४५ वर्षांवरील सर्व ग्रामस्थांनी कोविड प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. कुची येथे उपसरपंच विजय पाटील, ...
४५ वर्षांवरील सर्व ग्रामस्थांनी कोविड प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. कुची येथे उपसरपंच विजय पाटील, माजी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रा. भाऊसाहेब पाटील, माजी सभापती एम. के. (दादा) पाटील, आरोग्य अधिकारी सुप्रिया पाटोळे, आरोग्यसेविका पी. ए. वायचळ, आरोग्य सेवक डी. के. नरळे, आर. आर. चौगुले, ग्रामविकास अधिकारी एम. डी. साळुंखे, बाबूराव सूर्यवंशी उपस्थित होते. घाटनांद्रे येथे सामुदाय आरोग्य अधिकारी डाॅ. विद्या पाटील, आरोग्यसेविका सुवर्णा बागल, मंगल चव्हाण, आरोग्य सहाय्यक विनायक कुडचे, आशा वर्कर्स वैशाली कांबळे, राजश्री शिंदे, अर्धपरिचारिका मच्छगंधा कोळीसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी परिसरात रांगोळीसह सुशोभीकरण करण्यात आले होते. यावेळी लसीकरण मोहिमेस जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डाॅ. संतोष पाटील व जिल्हा साथरोग अधिकारी डाॅ. विवेक पाटील यांनी भेटी देऊन माहिती घेतली.