दिघंची-हेरवाड राज्यमार्गालगतच्या गावात चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:24 AM2021-01-22T04:24:46+5:302021-01-22T04:24:46+5:30
घाटनांद्रे : सध्या अगदी जलदगतीने काम सुरू असलेल्या दिघंची-हेरवाड या राज्यमार्गालगतच्या कुची, जाखापूर व घाटनांद्रे या गावातील रस्त्यालगतचा अडथळा ...
घाटनांद्रे : सध्या अगदी जलदगतीने काम सुरू असलेल्या दिघंची-हेरवाड या राज्यमार्गालगतच्या कुची, जाखापूर व घाटनांद्रे या गावातील रस्त्यालगतचा अडथळा ठरणाऱ्या घरावर संक्रांत येण्याची चिन्हे आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
घाटमाथ्यावर गेले दीड-दोन वर्षांपासून दिघंची ते हेरवाड या राज्यमार्गाचे संथगतीने काम सुरू आहे. आता ते काम पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. कुची, जाखापुर व घाटनांद्रे परीसरात हा मार्ग अगदी अरुंद व निमुळता आसुन येथे अनेक घरे व जागा या मार्गास आडथळा ठरत आहेत. त्यामुळे ही घरे काढली जाणार का या विषयी ग्रामस्थात आद्याप तर्कवितर्क काढले जात आहेत.
अद्याप तशा आशयाचे पत्र संबंधित मिळकतधारकांना रस्ता बांधकाम विभागाने दिले नाही; परंतु हा मार्ग कुची, जाखापूर व घाटनांद्रे गावामधून जात असल्याने या घरांबाबत नेमका काय निर्णय होतो; याबाबत अद्याप अनिश्चिता आहे.
फोटो-२१घाटनांद्रे१ व २
फोटो ओळी : घाटनांद्रे (ता. कवठेमहंकाळ) येथील याच अरुंद व निमुळत्या रस्त्यातून दिघंची-हेरवाड हा राज्यमार्ग निघणार आहे.