नियाेजनशून्य कारभारामुळे बसस्थानकाची अवस्था वाईट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:19 AM2020-12-27T04:19:43+5:302020-12-27T04:19:43+5:30
प्रवाशांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवल्या असून त्याही कितेक वर्षापासून मोडक्या तशाच पडून आहेत. लांब पल्याच्या बसेससाठी थांबणाय्रां प्रवाशांनाही पुरेशाप्रमाणात बसण्याची ...
प्रवाशांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवल्या असून त्याही कितेक वर्षापासून मोडक्या तशाच पडून आहेत. लांब पल्याच्या बसेससाठी थांबणाय्रां प्रवाशांनाही पुरेशाप्रमाणात बसण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना तासंतास उभेच रहावे लागत आहे. या समस्या सोडविण्याची नक्की जबाबदारी कुणाची असून ते का सोडवत नाहीत, असा संतप्त सवाल शनिवारी प्रवाशांनी उपस्थित केला आहे. काही बसेसमध्येही स्वच्छता असत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. पण, अधिकारी समस्या पहाण्यासाठी बसस्थानकात तर आले पाहिजेत.
चौकट
शाैचालये आहेत पण ते नेहमीच अस्वच्छता
-सांगली बसस्थानकामध्ये सुलभ शौचालय असून तेथे नेहमीच अस्वच्छता असल्याच्या नागरिकांच्या मोठ्याप्रमाणात तक्रारी आहेत.
-एसटी चालक आणि वाहकांसाठी रहाण्याची सोय केली आहे. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात अस्वच्छता आहे. शौचालयाची अत्यंत दुरावस्था आहे. याबाबत कर्मचारी वारंवार तक्रार करुनही याकडे फारसे लक्ष प्रशासन देत नसल्याचा आरोप आहे.
-बसस्थानकामधील अस्वच्छता तर नेहमीचाच चर्चेचा विषय असूनही याकडे प्रशासन का लक्ष देत नाही, असा सवाल प्रवाशी उपस्थित करीत आहेत.n सांगली बसस्थानकामध्ये सुलभ शौचालय असून तेथे नेहमीच अस्वच्छता असल्याच्या नागरिकांच्या मोठ्याप्रमाणात तक्रारी आहेत.
चौकट
एसटी बसस्थानकातील अस्वच्छतेबद्दल संबंधीतांना सूचना देऊन स्वच्छता करण्यात येतील. खड्डे मुजविण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची असून त्यांची चर्चा करून तेही मुजविण्यात येणार आहेत. खुर्च्यांची मोडतोड झाली असेल तर त्याचीही दुरुस्ती करण्यात येईल.
- आलम देसाई,
विभागीय वाहतुक अधिकारी.