नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:26 AM2021-05-06T04:26:42+5:302021-05-06T04:26:42+5:30
औषध फवारणीची मागणी सांगली : जिल्ह्यात विविध गावांमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. ज्या भागात कोरोना रुग्ण सापडतात, त्या ठिकाणी ...
औषध फवारणीची मागणी
सांगली : जिल्ह्यात विविध गावांमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. ज्या भागात कोरोना रुग्ण सापडतात, त्या ठिकाणी ग्रामपंचायतींकडून औषध फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. शिवाय, या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करणेही गरजेचे आहे.
-०-------------------
फुल उत्पादक शेतकरी अडचणीत
कामेरी : लॉकडाऊन असल्याने विविध कार्यक्रम व मंदिरे बंद आहेत. यामुळे फुलांच्या मागणीत घट झाली आहे. यामुळे सध्या कामेरी (ता. वाळवा) परिसरात फुल उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.
--------
कोरोना लसीसाठी नागरिकांची प्रतीक्षा
कुंडल : कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना डोससाठी आरोग्य केंद्रांवर हेलपाटे मारावे लागत आहेत. यामुळे लस लवकर व पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
-----------
पावसाने नुकसान
कामेरी : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. केळी, टोमॅटो, ढबू मिरची, शेवगा आदी ठिकाणी वादळाने नुकसान झाले आहे. पंचनामे करून नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
--------------
रेंजअभावी गैरसोय
चरण : शिराळा तालुक्यातील चरण परिसरात मोबाइल नेटवर्क सेवा सासत्याने खंडीत होत असल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषत: शसकीय कार्यालये, बँका व व्यापाऱ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
--------------
स्वच्छतागृहाचा अभाव
कासेगाव : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कित्येक किलोमीटर अंतरात सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे खासगी वाहनांतील प्रवाशांची गैरसोय होत असते. यासाठी खासगी ढाबे किंवा महामार्गाकडेच्या पेट्रोलपंपावरील स्वच्छतागृहाचा आधार घ्यावा लागत आहे.
--------------
पाण्याचा अपव्यय
आष्टा : शहराच्या अनेक भागांत पाणी मुबलक प्रमाणात मिळत आहे. मात्र, त्याची नागरिकांना किंमत नसल्यासारखे झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. पालिकेकडून उन्हाळ्यात गरज भासल्यास पाण्याची कपात केली जाते. त्यामुळे नागरिकांनीही पाण्याची बचत करण्याची गरज आहे.
-------------
कर्कश हॉर्नवर बंदीची मागणी
मिरज : शहरातील विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आदी परिसरात दुचाकी-चारचाकी वाहनधारकांकडून वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजवले जात आहेत. याचा नागरिकांना त्रास होत असून, वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.