कसबे डिग्रजला नदीवरील बंधाऱ्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:27 AM2021-04-16T04:27:11+5:302021-04-16T04:27:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कसबे डिग्रज : कृष्णा नदीवरील कसबे डिग्रज-मौजे डिग्रजदरम्यान असणाऱ्या बंधाऱ्याची पडझड होत आहे. बंधारा धोकादायक स्थितीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : कृष्णा नदीवरील
कसबे डिग्रज-मौजे डिग्रजदरम्यान असणाऱ्या बंधाऱ्याची पडझड होत आहे. बंधारा धोकादायक स्थितीत आहे. या बंधाऱ्यावर सुमारे १४ गावांतील २३ शेती आणि नळपाणीपुरवठा योजना आहेत. त्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीची मागणी आहे.
कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील बंधाऱ्यावर गेल्या काही वर्षांमध्ये दुरुस्ती व डागडुजीसाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाचे नियंत्रण आहे. तरीही त्याची दयनीय अवस्था झाली आहे. संरक्षक कठडे ढासळले आहेत. बांधकामाचे दगडही ढासळलेले आहेत. बंधाऱ्याच्या तळाला पडझड झाली आहे.
दरवेळी मजबुतीकरणाच्या नावाखाली खर्च होतो. बंधाऱ्यामुळे कसबे डिग्रजपासून भिलवडीपर्यंत असणाऱ्या नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यासाठी उपयोग होत आहे. त्यासाठी या बंधाऱ्याची डागडुजीचे काम दर्जेदार असावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, या बंधाऱ्याच्या दुरवस्थेबाबत राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पाहणी केली. दुरुस्तीसाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे निधीसाठी मागणी केली जाणार आहे, असे आनंदराव नलावडे यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच सागर चव्हाण, संजय शिंदे, संदीप निकम, प्रमोद चव्हाण, शरद कांबळे, राजेंद्र काटकर उपस्थित होते.