मालवाहतुकीसाठी आरटीपीसीआरची अट शिथिल करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:20 AM2021-06-02T04:20:39+5:302021-06-02T04:20:39+5:30
सांगली : राज्य शासनाने मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना आरटीपीसीआर चाचणीबाबत नव्याने निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात राज्याबाहेरून प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांचे ...
सांगली : राज्य शासनाने मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना आरटीपीसीआर चाचणीबाबत नव्याने निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात राज्याबाहेरून प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांचे तापमान, लक्षणे बघून प्रवेश द्यावा, अशी मागणी रुग्ण सहाय्य समितीचे सतीश साखळकर व वाहतूकदार संघटनेचे महेश पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्बंध लागू आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी मालवाहतुकीला या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. शासनाने परराज्यातून राज्यात प्रवेश करणाऱ्या मालवाहतूक वाहनातील व्यक्तीला आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली होती. त्याची वैधताही सात दिवस होती. १५ मे रोजी शासनाने या अटीत बदल केला आहे. राज्यात प्रवेश करणाऱ्या मालवाहतूक वाहनातील व्यक्तींचे तापमान, लक्षणे आणि आरोग्य सेतूवरील स्थिती तपासून प्रवेश देण्यात यावा असे नवे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार सांगली जिल्ह्यातही परराज्यातून येणाऱ्या वाहनांवरील व्यक्तींना तापमान, लक्षणे आणि आरोग्य सेतूवरील सद्यस्थिती तपासून प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.