कुपवाड आरक्षणावरून परस्परविरोधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:40 AM2020-12-16T04:40:39+5:302020-12-16T04:40:39+5:30

फोटो दोन वापरणे. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कुपवाड येथील सि. स. नंबर १९४ वरील प्लेग्राउंड व प्राथमिक शाळेचे ...

Conflicting agitation over Kupwad reservation | कुपवाड आरक्षणावरून परस्परविरोधी आंदोलन

कुपवाड आरक्षणावरून परस्परविरोधी आंदोलन

Next

फोटो दोन वापरणे.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कुपवाड येथील सि. स. नंबर १९४ वरील प्लेग्राउंड व प्राथमिक शाळेचे आरक्षण उठविण्यावरून मंगळवारी सर्वपक्षीय कृती समिती व बाधित नागरिकांनी महापालिकेसमोर परस्पर विरोधी आंदोलन केले. सर्वपक्षीय कृती समितीचा आरक्षण उठवण्यास विरोध करीत धरणे आंदोलन केले, तर नागरिकांनी हे आरक्षण रद्द करावे, अशी मागणी करून निदर्शने केली.

कुपवाड येथील दोन जागांवर प्लेग्राउंड व प्राथमिक शाळेचे आरक्षण आहे. या दोन्ही जागांवर नागरिकांनी गुंठेवारीअंतर्गत घरे बांधली आहेत. आरक्षण रद्द करण्याचा प्रस्ताव या १७ रोजी होणाऱ्या महासभेत घेण्यात आला आहे. यापैकी प्लेग्राऊंडचे आरक्षण असलेली जागा १४० गुंठे इतकी आहे. त्यातील ४५ गुंठे जागेत घरे झाली आहेत. हे आरक्षण रद्द झाल्यास उर्वरित ९५ गुंठे भूखंडावर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे भूखंडांवरील आरक्षण उठवण्यात सर्वपक्षीय कृती समितीने विरोध करत महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले.

या आंदोलनात माजी आमदार नितीन शिंदे, माजी नगरसेवक हणमंत पवार, गौतम पवार, सतीश साखळकर, नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, वि. द. बर्वे, ज्योती आदाटे, महेश खराडे, विकास मगदूम, शेरू सौदागर, युसूफ मिस्त्री, असिफ बावा, अविनाश जाधव, श्रीकांत शिंदे, आदिनाथ मगदूम, किरणराज कांबळे यांच्यासह सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते.

दरम्यान, आरक्षण भूखंडावर उभारलेल्या जिजामाता गृहनिर्माण संस्थेमधील रहिवाशांनी हे आरक्षण रद्द करावे, यासाठी महापालिकेसमोर निदर्शने केली. या आरक्षणामुळे ३७ घरे बाधित होत आहेत. शासनाकडून सर्वेक्षण होऊन आरक्षण रद्द करण्याची कारवाई सुरू आहे. महासभेत हा ठराव संमत करून शासनाकडे सादर करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली

आंदोलनाला नगरसेवक विष्णू माने, राजेंद्र कुंभार, कल्पना कोळेकर, महेश सागरे यांच्यासह राजू सासणे, राजेंद्र आडमुठे, रशीद गौसेकर, गणपती मगदूम, विशाल पवार, नसीमा सय्यद, शोभा घाडगे, रंजना कागल, रामचंद्र साळुंखे, वैजयंता पवार यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.

Web Title: Conflicting agitation over Kupwad reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.