सांगलीत खुल्या भूखंडावर शिवलिंग बसवले, स्थानिकांचे कृत्य; मंदिर बांधण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 18:39 IST2025-02-26T18:39:31+5:302025-02-26T18:39:31+5:30

सांगली : येथील अहिल्यादेवी होळकर चौकात महापालिकेच्या खुल्या जागेत शिवलिंग बसविल्याने गोंधळ निर्माण झाला. सोमवारी रात्री स्थानिकांनी शिवलिंग व ...

Confusion after installation of Shivling in the open space of Sangli Municipal Corporation | सांगलीत खुल्या भूखंडावर शिवलिंग बसवले, स्थानिकांचे कृत्य; मंदिर बांधण्याची मागणी

सांगलीत खुल्या भूखंडावर शिवलिंग बसवले, स्थानिकांचे कृत्य; मंदिर बांधण्याची मागणी

सांगली : येथील अहिल्यादेवी होळकर चौकात महापालिकेच्या खुल्या जागेत शिवलिंग बसविल्याने गोंधळ निर्माण झाला. सोमवारी रात्री स्थानिकांनी शिवलिंग व नंदीची मूर्ती बसवली. महापालिका व पोलिसांनी परिस्थिती हाताळत तीन दिवसांच्या तात्पुरत्या पूजेसाठी परवानगी दिली.

या चौकात महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर व्यायामाची साधने आहेत. भूखंडाला कुंपण व गेट आहे. तेथे सोमवारी रात्री स्थानिकांनी अचानक शिवलिंग व नंदीची मूर्ती बसवली. बुधवारच्या महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर येथे मंदिर उभारणीस सुरुवात करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. पण, त्यांचे हे कृत्य महापालिकेची परवानगी न घेता असल्याने बेकायदा ठरले. मंगळवारी सकाळी याची माहिती मिळताच प्रशासनाने रहिवाशांशी संवाद साधला.

महापालिकेची व अन्य संबंधित संस्थांची रीतसर परवानगी घेऊनच मंदिर उभारावे, अशी सूचना केली. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तीन दिवस पूजेसाठी तात्पुरती परवानगी दिली.
दरम्यान, धार्मिक वादाचा विषय असल्याने संजयनगर पोलिसांनी तेथे बंदोबस्त ठेवला आहे.

रहिवाशांनी सांगितले की, या भूखंडाचा काहींकडून गैरवापर सुरू आहे. गेट निघाले असून भूखंडावर गैरकृत्ये सुरू आहेत. त्यामुळे येथे महादेवाचे मंदिर उभारावे अशी आमची मागणी आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकळपासून येथे मंडप उभारून पूजेची तयारी सुरू होती. त्यासाठी महिला मोठ्या संख्येने गोळा झाल्या होत्या.

Web Title: Confusion after installation of Shivling in the open space of Sangli Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.