हमीभाव केंद्रांवर गोंधळाचीच हमी! : शेतकऱ्यांत अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:41 PM2018-10-22T23:41:57+5:302018-10-22T23:44:17+5:30

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उडीद, मूग व सोयाबीनचे बिल पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असताना, आॅनलाईन सात-बारा उताऱ्यातील अडचणी अद्याप कायम आहेत.

 Confusion guarantees confusion at the centers! : Unhealthy in Farmers | हमीभाव केंद्रांवर गोंधळाचीच हमी! : शेतकऱ्यांत अस्वस्थता

हमीभाव केंद्रांवर गोंधळाचीच हमी! : शेतकऱ्यांत अस्वस्थता

googlenewsNext
ठळक मुद्दे आॅनलाईन अडचणी : शेतकऱ्यांत अस्वस्थताखरेदी केंद्रासाठी प्रस्ताव आलेला नसल्याने शेतकºयांना इतरत्र शेतीमाल न्यावा लागणार

सांगली : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उडीद, मूग व सोयाबीनचे बिल पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असताना, आॅनलाईन सात-बारा उताऱ्यातील अडचणी अद्याप कायम आहेत. त्यातच जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्यास प्रस्तावच दाखल झाले नसल्याने केवळ तीन ठिकाणी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. शेतकºयांना नोंदणीसाठी दिलेली मुदतवाढही बुधवार, दि. २४ रोजी संपणार असल्याने नोंदणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) मार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सोयाबीन, मूग व उडीद हमीभाव केंद्रे जिल्ह्यात सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी प्रसिध्दी देऊनही जिल्हाभरातून अल्प प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी खरेदी केंद्र अपेक्षित असताना, केवळ सांगली, तासगाव व विटा येथेच खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

उर्वरित ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी एकाही संस्थेकडून प्रस्ताव आलेला नसल्याने त्या भागातील शेतकºयांची मोठी पंचाईत झाली आहे.जिल्ह्यात सांगली येथे विष्णुअण्णा पाटील खरेदी-विक्री संघ, खानापूर तालुका खरेदी-विक्री संघ, विटा व आर. आर. पाटील खरेदी -विक्री संघ तासगाव या तीनच ठिकाणी नोेंदणी सुरू आहे. याउलट जतसारख्या ठिकाणी उडदाची अधिक नोंदणी अपेक्षित असताना त्याठिकाणी एकाही संस्थेने केंद्र सुरू करण्याबाबत प्रस्ताव दिलेला नाही. तसेच वाळवा तालुक्यातही सोयाबीनचे क्षेत्र चांगले असताना तेथेही खरेदी केंद्रासाठी प्रस्ताव आलेला नसल्याने शेतकºयांना इतरत्र शेतीमाल न्यावा लागणार आहे.

खरेदी केंद्राची अडचण असतानाच शेतीमालाच्या नोंदणीसाठी आॅनलाईन सात-बारा उतारा सक्तीचा करण्यात आला आहे. सर्व्हरमधील अडचणीमुळे उतारा मिळण्यास अडचणी येत असल्याने अनेक शेतकºयांना नोंदणीस अडचणी येत होत्या. या आठवड्यात मात्र, सात-बारा उताºयातील अडचण बºयापैकी दूर झाली आहे. त्यात शिथिलता देण्याबाबतही आदेश अधिकाºयांनी दिले आहेत.

नोंदणीसाठी मुदतवाढ : मिळणार का?
उडीद, मूग व सोयाबीनच्या आॅनलाईन नोंदणीसाठी सुरूवातीला १० आॅक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. तोपर्यंत एकही नोंदणी न झाल्याने ही मुदत वाढवीत उडीद व मुगासाठी २४ आॅक्टोबरपर्यंत, तर सोयाबीनला ३१ आॅक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. नोंदणीसाठी शेतकºयांचा प्रतिसाद व कागदपत्रांच्या अडचणी लक्षात घेता, पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा शेतकºयांतून व्यक्त होत आहे.
 

थेट विक्रीस प्राधान्य...
केंद्र सरकारने शेतमालाला हमीभाव देण्याची घोषणा करत दर जाहीर केले असले तरी, दर पदरात पाडून घेण्यासाठी शेतकºयांचे हाल होत आहेत. परिणामी नोंदणी करून शेतमाल विक्री करण्यापेक्षा थेट व्यापाºयांकडेच माल विक्रीसाठी नेण्याची शेतकºयांची मानसिकता निर्माण झाली आहे. त्यातच सांगली मार्केट यार्डात सोयाबीनला फक्त हमीभावाइतका दर मिळत असल्याने शेतकºयांनी नोंदणीपेक्षा थेट विक्रीस प्राधान्य दिले आहे. सोयाबीनला ३३९९ रुपये प्रती क्विंटल, उडीद ५६०० रुपये प्रती क्विंटल, तर मुगाला ६९७५ रुपये प्रती क्विंटल हमीभावाप्रमाणे दर मिळणार आहे.


जिल्हाभरातून केवळ ८७ शेतकऱ्यांनीच केली नोंदणी
सांगलीत सोयाबीनसाठी एकाही शेतकºयाने नोंदणी केलेली नाही, तर उडिदाची ६०, तर मुगाची केवळ ३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तासगावला सोयाबीनला ३, उडिदासाठी २, तर मुगासाठी एकाही शेतकºयाची नोंद नाही. विटा येथे सोयाबीनची २, उडीद १४, तर मुगाची ३ शेतकºयांनी आजवर नोंदणी केली आहे.

Web Title:  Confusion guarantees confusion at the centers! : Unhealthy in Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.