‘मी मर्डर केलाय म्हणत’ सांगलीत एकाचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:22 AM2020-12-25T04:22:39+5:302020-12-25T04:22:39+5:30

सांगली : तमिळनाडूतून प्रशिक्षणासाठी सांगलीत आलेल्या एकाने अर्धनग्न होत बुधवारी मध्यरात्री शहरातील तात्यासाहेब मळा परिसरात चांगलाच गोंधळ घातला. कशानेतरी ...

Confusion of one in Sangli saying 'I have committed murder' | ‘मी मर्डर केलाय म्हणत’ सांगलीत एकाचा गोंधळ

‘मी मर्डर केलाय म्हणत’ सांगलीत एकाचा गोंधळ

Next

सांगली : तमिळनाडूतून प्रशिक्षणासाठी सांगलीत आलेल्या एकाने अर्धनग्न होत बुधवारी मध्यरात्री शहरातील तात्यासाहेब मळा परिसरात चांगलाच गोंधळ घातला. कशानेतरी जखम झाल्याने रक्तबंबाळ असलेल्या या व्यक्तीने पोलीस आल्यानंतर ‘मी मर्डर केलाय’ असे सांगितल्याने पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली. अखेर तो मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले. तंगामलाई सोलाईराजा (वय ३७, मदुराई, तमिळनाडू) असे त्याचे नाव आहे.

शहरातील तात्यासाहेब मळा परिसरातील एका सदनिकेत तामिळनाडूमधून दोन व्यक्ती बुधवारी सायंकाळी आल्या होत्या. यंत्राच्या प्रशिक्षणासाठी या व्यक्ती आल्या होत्या. मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्या इमारतीमधून ओरडण्याचा आवाज आला व थोड्याचवेळात ओरडणारी व्यक्ती अंगावरील कपडे फाडून फेकून देत रस्त्यावर आली. दंगा करतच त्याने आजूबाजूच्या घरावर दगड मारला. गोंधळ वाढल्याने नागरिकांनी तातडीने विश्रामबाग पोलिसांना माहिती दिली. पोलीस येण्याअगोदरच त्याने वाहनांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

पोलीस येताच मात्र ती व्यक्ती खोलीत जाऊन कपडे घालून पुन्हा बाहेर आली. यावेळी त्यास काहीतरी लागल्याने तो रक्तबंबाळ झाला होता. पोलिसांनी त्यास याबाबत विचारले असता, त्याने मी मर्डर केला असून एखादी रेल्वे येऊन जाऊ दे, तुम्हालाही कळेल, असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण रेल्वे रुळाचा परिसर पिंजून काढला. मात्र, काही आढळून आले नाही.

चौकट

रक्तदाब वाढला

त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीने उच्च रक्तदाब वाढला की, त्यास काय करतोय हे कळत नाही. तो मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले. या माथेफिरूचा रक्तदाब वाढला असला तरी त्याने संपूर्ण परिसरात तणाव वाढवला होता.

Web Title: Confusion of one in Sangli saying 'I have committed murder'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.