लसीकरण केंद्रांवर सावळागोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:27 AM2021-04-27T04:27:00+5:302021-04-27T04:27:00+5:30
वडर कॉलनी सकाळपासूनच लोक लसीकरणासाठी आले होते. जागा अपुरी असल्याने लोक गर्दी करून होते. बसायला खर्च्याही कमी होत्या. महिला ...
वडर कॉलनी
सकाळपासूनच लोक लसीकरणासाठी आले होते. जागा अपुरी असल्याने लोक गर्दी करून होते. बसायला खर्च्याही कमी होत्या. महिला कर्मचारी चारजणांचे नावे पुकारत होती. तितकेच लोक लसीकरणासाठी आत सोडले जात होते. सोशल डिस्टन्सिंग नव्हते. काहींनी मास्क घातला नव्हता.
अभयनगर
येथे लसीसाठी मोठी गर्दी होती. गेटवरच झोंबाझोंबी सुरू होती. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतरही लोक आत जाण्यासाठी धडपड होते. लोकांना बसण्याची व्यवस्था अपुरी होती. अकरानंतर जादा खुर्च्या मांडण्यात आल्या. केंद्राच्या आतील गेटवरही लोकांची गर्दी होती.
हनुमाननगर
साडेअकरा वाजता २०० लोकांची नोंद झाली होती. नव्याने आलेल्यांना आता लस मिळणार नसल्याचे सांगण्यात येत होते. बसण्यासाठी घातलेला मंडपही अपुरा होता. लोकांच्या हातावर नंबर टाकले होते. नंबरानुसार पाच जणांना बोलविले जात होते. पुरुष, महिलांनी खुर्च्या कमी असल्याने जमिनीवर ठाण मांडले होते.
शामरावनगर
आरोग्य केंद्रावर दोरी लावून दोन भाग केले होते. एका भागात लसीकरणासाठी लोकांना बसण्याची व्यवस्था होती. तिथेच टेबल मांडून नोंद केली जात होती. त्यांना नंबराची चिठ्ठी देऊन वेटिंगला बसविले होते. दुसर्या बाजूला कोरोना चाचणी सुरू होती. चाचणी व लसीकरण एकाच छताखाली सुरू होते.