सांगलीत काँग्रेसच्यावतीने निषेध रॅली, शहीद जवानांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 01:23 PM2019-02-15T13:23:03+5:302019-02-15T13:23:55+5:30
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा शहर काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस कमिटीसमोर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत निषेध रॅलीही काढली.
सांगली : पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा शहर काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस कमिटीसमोर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत निषेध रॅलीही काढली.
काँग्रेस कमिटीसमोर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पाकिस्तानविरोधात घोषणाही देण्यात आल्या.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक प्रकाश मुळके, माजी नगरसेवक महंमद मणेर, अमर निंबाळकर, मिरज पंचायत समितीचे माजी सभापती अण्णासाहेब कोरे, नामदेव कस्तुरे, बिपीन कदम, अमित पारेकर उपस्थित होते. श्रद्धांजली वाहिल्यानंतर स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत निषेध रॅलीही काढण्यात आली.