शिराळा येथील भ्रष्टाचाराचा भांडाफोड काँग्रेसने केला उघड : नगरपंचायतकडून मर्जीतल्या लोकांंना मनमानी पध्दतीने टेंडर देण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:32 AM2018-01-18T00:32:02+5:302018-01-18T00:32:14+5:30
शिराळा : येथील नगरपंचायतीने दि. १२ जानेवारी २०१८ रोजी वाचनालयामागील बुरुड गल्ली येथील क्रॉस गटार करणे व खेड फाटा शिराळा येथे क्रॉस गटार करणे या कामासाठी टेंडर मागविले होते.
शिराळा : येथील नगरपंचायतीने दि. १२ जानेवारी २०१८ रोजी वाचनालयामागील बुरुड गल्ली येथील क्रॉस गटार करणे व खेड फाटा शिराळा येथे क्रॉस गटार करणे या कामासाठी टेंडर मागविले होते. परंतु टेंडर माहितीमध्ये त्याचे इस्टिमेट न देता स्वत:च्या मर्जीतील लोकांनी मनमानी रकमेने टेंडर मिळविण्याचा घाट घातला होता. या भ्रष्टाचाराचा भांडाफोड काँग्रेसच्यावतीने करण्यात आला.
टेंडर भरणेची मुदत संपण्याआधीच कामे पूर्णही झाली होती. पैकी खेड फाटा येथील क्रॉस गटारीचे काम, तर शिराळ्याच्या हद्दीत देखील येत नसून फक्त पैसे मिळविण्यासाठी सत्ताधाºयांनी हे काम दाखवून भ्रष्टाचार केला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी होण्यासाठी शिराळा तहसीलदार व प्रांताधिकारी तथा भ्रष्टाचार निर्मूलन अधिकारी यांना या कामाचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. प्रथमदर्शनी तरी भ्रष्टाचार झाल्याचे निर्दशनास आल्याने प्रांताधिकाºयांनी त्याचे पंचनामे करून तात्काळ अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार तहसीलदार यांनी मंडल अधिकारी अनंता भानुसे यांची नेमणूक करून, त्यांनी तात्काळ या सर्व कामांचे पंचनामे करून तसा अहवाल सादर केला आहे. पुढील चौकशी सुरु असून संबंधितांवर तातडीने कायदेशीर कार्यवाही व्हावी, अशी मागणी शिराळा शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने केली आहे.
हा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी सम्राटसिंह पृथ्वीराज शिंदे, माजी जि. प. सदस्य महादेव कदम, माजी ग्रा.पं. सदस्य अजय जाधव, अभिजित यादव, कुलदीप निकम, रणजित नलवडे आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
अहवाल : देणार
पैकी खेड फाटा येथील क्रॉस गटारीचे काम, तर शिराळ्याच्या हद्दीत देखील येत नसून फक्त पैसे मिळविण्यासाठी सत्ताधाºयांनी हे काम दाखवून भ्रष्टाचार केला आहे. याबाबत काँग्रेसने आवाज उठवला. यासाठीचे पुरावेही सादर करण्यात आले आहेत. प्रांताधिधकाºयांनी याबाबत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.