काँग्रेस-राष्ट्रवादीकडून राज्याच्या तिजोरीवर दरोडा : पूनम महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 11:08 PM2018-02-22T23:08:40+5:302018-02-22T23:18:16+5:30

सांगली : पंधरा वर्षे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या काँग्रेस व राष्ट्रवादीकडे होत्या. मॅनेजर असलेल्या मतदारांनाही चाव्या दिलेल्या नाहीत. तिजोरीवर दरोडा टाकून जनतेची स्वप्न लुटली,

Congress-NCP crackdown on state's safe: Poonam Mahajan | काँग्रेस-राष्ट्रवादीकडून राज्याच्या तिजोरीवर दरोडा : पूनम महाजन

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून राज्याच्या तिजोरीवर दरोडा : पूनम महाजन

googlenewsNext
ठळक मुद्देसांगलीत भाजप युवा मोर्चा संवाद परिषद, कुणाशीही मधुचंद्र होऊ दे, राजकारणाच्या चिखलात कमळ उगविणारच

सांगली : पंधरा वर्षे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या काँग्रेस व राष्ट्रवादीकडे होत्या. मॅनेजर असलेल्या मतदारांनाही चाव्या दिलेल्या नाहीत. तिजोरीवर दरोडा टाकून जनतेची स्वप्न लुटली, असा घणाघात भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा. पूनम महाजन यांनी गुरुवारी सांगलीत केला.

भाजप युवा मोर्चाच्यावतीने आयोजित संवाद परिषदेत त्या बोलत होत्या. केंद्र व राज्यातील भाजप सरकारविरोधात राज्यात विरोधकांकडून सभा, यात्रा काढल्या जात आहेत; पण आम्ही कामातून सत्तेवर आलो आहोत. विरोधकांनी थोडं दमाने घ्यावे, असा टोलाही त्यांनी लगाविला.

महाजन म्हणाल्या की, आज राज्यात कुणाचा कुणाशाही मधुचंद्र सुरू आहे. इंजिन घडाळ्याकडे चालले आहे. कुणी हात दाखवित आहे. कुणाकडे धनुष्यबाण चालले आहे. या राजकारणाच्या चिखलात भाजपचे कमळ जोरात उमललेले असेल, असे भाष्यही केले. दरोडे घालणाºयांकडून काय अपेक्षा ठेवायच्या? असा सवालही केला.

दादा, ताई, भाऊ यावर भाजप चालत नाही. कार्यकर्त्यांच्या कामावर पक्ष चालतो. म्हणून चहावाला देशाचे पंतप्रधान झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक योजना आखल्या आहेत. मॅग्नेटिक महाराष्ट्रातून लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात होत आहे. कौशल्य विकास कार्यक्रमातून ३० लाख युवकांना नोकरी देणार आहोत. उलट विरोधकांनी जातीपातीचे राजकारण सुरू केले आहे. बँक घोटाळ्याचे आरोप करणाºयांचे २००४ पासून घोटाळे उघड झाले तर पळताभुई थोडी होईल. पकोडा विकणे चुकीचे नाही. तुम्ही सारेच पकोडा खाता का इटलीचा पिझ्झा? असे म्हणत काँग्रेसला टोला लगाविला.

प्रारंभी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. यावेळी खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. योगेश टिळेकर, पृथ्वीराज देशमुख यांची भाषणे झाली. कार्यक्रमास आ. सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, संग्रामसिंह देशमुख, भगवानराव साळुंखे, शेखर इनामदार, दिनकरतात्या पाटील उपस्थित होते.

संजयकाकांचे कौतुक, महापौरांना टोला
खा. संजयकाका पाटील यांच्या कामाचे पूनम महाजन यांनी कौतुक केले. कोट्यवधींचा निधी आणणारा खासदार असा उल्लेख करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही सांगलीच्या प्रश्नांवर संजयकाकांशी चर्चा करतात, असे सांगितले.
भाजपच्या आमदारांनी रस्त्यासाठी ६० कोटीचा निधी आणला. येथील महापौरांनी काहीच केले नाही. त्यांच्या मनातच खड्डे आहेत, असा टोला महाजन यांनी लगाविला,

Web Title: Congress-NCP crackdown on state's safe: Poonam Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.