अपहाराकडे अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

By admin | Published: December 5, 2015 12:34 AM2015-12-05T00:34:38+5:302015-12-05T00:44:13+5:30

जिल्हा परिषद सदस्यांचा आरोप : सुरेश मोहिते करणार पीआरसी समितीकडे लेखी तक्रार--घोटाळे करा बिनधास्त राहा-४

Consciously ignored of the hijackers | अपहाराकडे अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

अपहाराकडे अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

Next

सांगली : जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींमध्ये कर्मचाऱ्यांकडून पंचवीस वर्षात चार कोटींचा अपहार झाला असून, त्याची जबाबदारीही निश्चित झाली आहे. तरीही अधिकाऱ्यांकडून अपहाराची रक्कम वसूल केलेली नसल्याबद्दल ‘लोकमत’मधून मालिका प्रसिध्द झाली. त्यानंतर प्रशासनाच्या भूमिकेबद्दल जिल्हा परिषद सदस्यांनी संताप व्यक्त केला. वसुलीकडे अधिकारी जाणीवपूर्वकच दुर्लक्ष करीत असल्याचा सदस्यांनी आरोप केला. काँग्रेसचे पक्षप्रतोद सुरेश मोहिते यांनी, अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल पीआरसी समितीकडे लेखी तक्रार करणार असल्याचे सांगितले. (समाप्त)


ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याचे सिध्द झाले आहे. त्या अपहाराची रक्कमही निश्चित झाली असताना, संबंधित अधिकाऱ्यांना ती रक्कम वसूल करण्यात अडचणच नाही. परंतु, जाणीवपूर्वक वसुलीकडे दुर्लक्ष करून अधिकारी तीन वर्षाचा कार्यकाल संपवून बदली करवून घेऊन निघून जात आहेत. अधिकाऱ्यांनी असे न करता अपहार करणाऱ्यांच्या पगार आणि मालमत्तेवर बोजा चढवून रक्कम वसूल करण्याची गरज आहे. पीआरसी समितीकडे तक्रार करणार आहे.
- सुरेश माहिते,
पक्षप्रतोद, जिल्हा परिषद.


शासनाकडून ग्रामपंचायतींना कोट्यवधीचा निधी दिला जात आहे. या निधीचा योग्यप्रकारे खर्च होतो की नाही, हे लेखापरीक्षण झाल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे शासनाने वर्षाला सक्तीने ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण करण्याची गरज आहे. लेखापरीक्षणाचा अहवाल जिल्हा परिषदेला मिळाला पाहिजे. दरवर्षीचा अहवाल मिळाल्यास अपहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर, पुढील निधी रोखण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला दिला पाहिजे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे.
- छायाताई खरमाटे,
सदस्या, जिल्हा परिषद

‘लोकमत’ने ‘घोटाळे करा बिनधास्त राहा’ या मालिकेच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर प्रकाशझोत टाकून जनतेला सज्ञान केले आहे. योजनांची माहिती जनतेला कळू दिली जात नाही. सर्वप्रथम समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत माहिती कळविल्यास त्याच्या अंमलबजावणीबाबत लोक दक्ष राहतील. कर्मचारी व अधिकाऱ्यांवर वचक ठेवला पाहिजे. भ्रष्टाचार सिध्द झाल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.
- सुरेंद्र वाळवेकर,
सरपंच, भिलवडी.

येत्या आठ दिवसात अपहार झालेल्या गावातील सर्व ग्रामसेवकांची बैठक घेऊन दोषींवर रक्कम निश्चित करण्यात येणार आहे. याचा अहवाल तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहे. दोषींवर फौजदारी कारवाई सुध्दा होईल. सेवेत असणाऱ्यांच्या पगारातून अपहाराची रक्कम वसुली करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यास प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवून अपहाराची रक्कम वसूल करणार आहे.
- रविकांत आडसूळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.

Web Title: Consciously ignored of the hijackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.