लॉकडाऊनमुळे परीक्षेपासून वंचित विद्यार्थ्यांचा विचार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:20+5:302021-07-23T04:17:20+5:30
सांगली : कोरोना व लॉकडाऊनमुळे दहावी, बारावीच्या परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घेऊन निकाल जाहीर करावा, अशी मागणी ...
सांगली : कोरोना व लॉकडाऊनमुळे दहावी, बारावीच्या परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घेऊन निकाल जाहीर करावा, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.
गेल्या दीड वर्षांत कोरोनामुळे राज्यभरात लाखो विद्यार्थ्यांना स्थलांतर करावे लागले. त्यातील अनेकांना लॉकडाऊनमुळे शाळेत येता आले नाही तसेच परीक्षेचा फॉर्म भरता आला नाही. काही पालकांना उत्पन्न थांबल्याने परीक्षेचे शुल्क देता आले नाही. असे विद्यार्थी परीक्षेत नोंद न झाल्याने अनुत्तीर्ण झाले आहेत. गुणवत्ता असूनही ते शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जाण्याची शक्यता आहे. त्यांचे शिक्षण थांबण्याची भीती आहे. त्यामुळे परीक्षा मंडळाने अशा विद्यार्थ्यांसाठी खास मोहीम राबवावी. त्यांचे परीक्षा फॉर्म भरून घ्यावेत आणि गुणदान करावे. यामुळे हे विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.
परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे, राजेंद्र सूर्यवंशी, सोमनाथ राठोड यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व परीक्षा मंडळाला तसे निवेदन पाठविले आहे.