आंबेडकर जयंतीला संविधान बचाव दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:25 AM2021-04-13T04:25:12+5:302021-04-13T04:25:12+5:30
इस्लामपूर : वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती 'संविधान बचाव ...
इस्लामपूर : वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती 'संविधान बचाव दिन' म्हणून साजरी करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील यांनी दिली.
इस्लामपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती नियोजन बैठकीमध्ये ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. पदाधिकाऱ्यांनी १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात यावे, असे आवाहनही पाटील यांनी केले.
यावेळी राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, राज्य चिटणीस अॅड. चिमन डांगे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, महिला तालुकाध्यक्षा सुस्मिता जाधव आदी उपस्थित होते.