महाजनादेश यात्रेकरिता महावितरणचे ग्राहक वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:04 AM2019-09-17T00:04:20+5:302019-09-17T00:04:24+5:30

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची महाजनादेश यात्रा राज्यभर सुरू असून, तिचे आगमन सोमवारी सांगलीत झाले. वाहनांच्या ...

Consumers of Mahavidyar for Mahajadeesh Yatra | महाजनादेश यात्रेकरिता महावितरणचे ग्राहक वेठीस

महाजनादेश यात्रेकरिता महावितरणचे ग्राहक वेठीस

googlenewsNext

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची महाजनादेश यात्रा राज्यभर सुरू असून, तिचे आगमन सोमवारी सांगलीत झाले. वाहनांच्या ताफ्यातील रथाच्या उंचीमुळे अडथळा नको म्हणून महावितरण कंपनीने रस्त्यावरील विद्युत तारा तोडल्यामुळे पलूस तालुक्यातील बांबवडे, येळावीतील नागरिकांना अंधारात रहावे लागले. सांगली शहरातही काही भागात सोमवारी रात्री नऊपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. लोकांना वेठीस धरल्याने संतप्त प्रतिक्रिया आहेत. अनेक झाडांची कत्तलही करण्यात आली.
सांगलीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या यात्रेतील वाहनाला अडथळा नको म्हणून सुरक्षेसाठी विजेच्या तारा तोडल्याने त्याचा बोजा ग्राहकांवर बसणार आहे. मात्र वीज जोडणीचा फारसा खर्च नसल्याचा दावा महावितरणचे अधिकारी करीत आहेत. प्रत्यक्षात पलूस ते पाचवा मैल या रस्त्यावरील बारा ते तेरा ठिकाणच्या तारा तोडल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे अनेक कुटुंबांना अंधारातच स्वागत करावे लागले. उंच वाहनांना अडथळा नको म्हणून अनेक ठिकाणच्या विद्युत तारा तोडून त्याचा लाखो रुपयांचा खर्च ग्राहकांवर का?, असा सवाल उपस्थित होत आहे.
पलूस तालुक्यातील बांबवडे आणि तासगाव तालुक्यातील येळावी गावातील अनेक कुटुंबीयांच्या घरात दोन दिवस अंधार होता. राज्य सरकारने रॉकेल देणेही बंद केल्यामुळे तेथील कुटुंबीयांचे प्रचंड हाल झाले. याला जबाबदार कोण, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष महावीर पाटील यांनी उपस्थित केला आहे. ग्रामीण भागाबरोबरच मिरज ते सांगली, आंबेडकर रस्ता ते कोल्हापूर रस्त्यावरील अनेक ठिकाणच्या विद्युत तारा तोडाव्या लागल्या आहेत. महाजनादेश यात्रा गेल्यानंतरही अनेक ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केला.

महाजनादेश यात्रेमुळे जनता अंधारात : संतोष पाटील
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी सांगली-मिरजेतील वृक्षांची कत्तल करण्यात आली. त्याचबरोबर यात्रेच्या मार्गावरील विद्युतपुरवठाही खंडित करण्यात आला. यात्रा संपल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत कॉलेज कॉर्नर, उत्तर शिवाजीनगर, काँग्रेस कमिटी, पुष्पराज चौक, कोल्हापूर रोड परिसर अंधारात होता. महाजनादेश यात्रेमुळे जनतेत आनंदाचे वातावरण अपेक्षित होते. पण या यात्रेने सांगलीकरांना अंधारात ढकलल्याची टीका मदनभाऊ युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक संतोष पाटील यांनी केली.

Web Title: Consumers of Mahavidyar for Mahajadeesh Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.