‘जीएसटी’ प्रणालीमुळे व्यवहारात सुसूत्रता : एस. ए. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:23 PM2018-03-30T23:23:39+5:302018-03-30T23:23:39+5:30

यापूर्वी करदात्यांना तीन वेगवेगळ्या विभागाकडे कर भरण्यासाठी जावे लागत होते

Consumption in practice by GST system: S. A. Patil | ‘जीएसटी’ प्रणालीमुळे व्यवहारात सुसूत्रता : एस. ए. पाटील

‘जीएसटी’ प्रणालीमुळे व्यवहारात सुसूत्रता : एस. ए. पाटील

googlenewsNext
ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेत आयकर भरण्यात वाढ; आठ महिन्यात करदातेही वाढले

यापूर्वी करदात्यांना तीन वेगवेगळ्या विभागाकडे कर भरण्यासाठी जावे लागत होते. मात्र जीएसटी आल्यानंतर वेगवेगळे करभरणा, विवरणपत्र, करनिर्धारण, लेखापरीक्षण तसेच वेगवेगळ्या विभागाचा त्रास कमी झाला आहे. भविष्यात सर्व व्यवहार सुरळीत होतील. जीएसटी करप्रणाली निश्चितपणे चांगली आहे. यासंदर्भात सांगलीतील कर सल्लागार एस. ए. पाटील यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...

प्रश्न : जीएसटी लागू झाल्यानंतर या आठ ते नऊ महिन्यांमध्ये कर भरण्यामध्ये काय फरक पडला?
उत्तर : व्यापार वाढीसाठी व योग्यप्रकारे नियोजन, पारदर्शकता, संगणकीकरण, भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी ‘एक देश, एक कर’ कायद्याची आवश्यकता होतीच. या करप्रणालीमुळे व्यवहारात सुसूत्रता आली आहे. संगणकीकरणामुळे मानवी हस्तक्षेप कमी झाला आहे. यातून भ्रष्टाचाराला आळा बसेल. जीएसटी खरोखरच काळाची गरज आहे. दि. १ एप्रिल २0१८ पासून ई-वे बिल कर प्रणाली आंतरराज्य व्यवहारासाठी बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्यामुळे कर चुकवेगिरीला मोठ्या प्रमाणात आळा बसण्याची शक्यता आहे. परंतु त्यासाठी संगणकाच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या पाहिजेत, तरच व्यापाऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही. जीएसटी लागू झाल्यानंतर या आठ ते नऊ महिन्यांमध्ये कर भरणा व करदात्यांमध्ये वाढ झाली आहे. जीएसटी दरामध्ये सुरुवातीला मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे लोकांना त्याचा त्रास झाला. लहान-मोठ्या व्यापारांना दरमहा जीएसटीआर रिटर्न भरावे लागत आहे. सरकारने लहान-मोठ्या व्यापाºयांचे वर्गीकरण न करता सर्वांना दरमहा जीएसटीआर भरणे आवश्यक आहे. लहान-मोठ्या व्यापाºयांच्या वर्गीकरणांची दक्षता सरकारने घेतली असती, तर लहान व्यापाºयांना दरमहाऐवजी तिमाही कर भरता आला असता. त्यामुळे संगणक प्रणालीवर अनावश्यक भार पडला नसता.
प्रश्न : जीएसटी कर प्रणालीत कोणत्या त्रुटी आढळून आल्या? त्याचा काय परिणाम झाला?
उत्तर : जीएसटी करप्रणालीत सुरुवातीला बºयाच तांत्रिक त्रुटी आढळून आल्याने करदात्यांना उशिरा शुल्क भरावे लागल्याने खूप त्रास झाला. शासनाला उशिरा का होईना जाग आली. शासनाने सुधारणा करून पहिल्या तीन महिन्याचे उशिरा शुल्क माफ केले. पुढील महिन्यासाठी उशिरा शुल्क कमी केले. सुरुवातीला प्रतिदिवस तीनशे रुपये उशिरा शुल्क होते, सध्या प्रतिदिवस पन्नास रुपये उशिरा शुल्क आकारले जात आहे.
प्रश्न : कर विभाग, कर सल्लागार आणि ग्राहक सर्वजण सध्या संभ्रमावस्थेत दिसतात. हा संभ्रम दूर होणार का? आणि कधी होणार?
उत्तर : सध्या कर विभाग व कर सल्लागार यांच्यातील संभ्रम बºयाचअंशी कमी झाला आहे. फक्त ग्राहकांमध्ये संभ्रम जाणवतो. हळूहळू जीएसटी कायदा सर्वांना सोपा असल्याचे जाणवत जाईल. त्यानंतर हा संभ्रम आपोआप दूर होईल.
प्रश्न : एकूणच करप्रणालीत सुलभता आली आहे का? मार्चअखेरीस आयकर प्रणालीत काय फरक जाणवतो?
उत्तर : निश्चितच नव्या करप्रणालीमुळे ग्राहकांमध्ये काही प्रमाणात द्विधा मन:स्थिती सुरुवातीच्या काळात होती. मात्र आता ग्राहकांनाही प्रणाली समजली आहे. एकूणच कर प्रणालीत सुलभता आली आहे. जीएसटी करदात्यांमध्ये वाढ झाल्याने आयकर प्रणालीद्वारे गतवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आयकर भरण्यामध्ये वाढ होत आहे.
- सचिन लाड, सांगली

Web Title: Consumption in practice by GST system: S. A. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.