जिल्ह्यातील ८३ गावांत दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 11:49 PM2017-07-18T23:49:14+5:302017-07-18T23:49:14+5:30

जिल्ह्यातील ८३ गावांत दूषित पाणी

Contaminated water in 83 villages in the district | जिल्ह्यातील ८३ गावांत दूषित पाणी

जिल्ह्यातील ८३ गावांत दूषित पाणी

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील ८३ गावांतील पाण्याचे १२५ नमुने दूषित आढळून आले असून टीसीएल पावडरचे १६६ नमुनेही निकृष्ट दर्जाचे सापडले आहेत. या टीसीएल पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण ३० टक्केच्या पुढे असणे गरजेचे आहे. परंतु, तपासणी केलेल्या नमुन्यामध्ये ३० टक्केपेक्षा कमी क्लोरिनचे प्रमाण असल्यामुळे जिल्हा परिषदेकडून गावांना नोटिसा बजाविल्या आहेत. जिल्हा परिषदेकडून वारंवार पाण्याचे नमुने दूषित आढळून आलेल्या चोवीस गावांना पिवळे कार्ड दिले आहे.
जिल्हा परिषदेकडून दर महिन्याला पाणी आणि टीसीएल पावडरच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. जून २०१७ या महिन्यात जिल्ह्यातील गावांचे पाणी नमुने तपासणीसाठी घेतले होते. यामध्ये नऊ तालुक्यातील ८३ गावांतील १२५ पाण्याचे नमुने दूषित आढळून आले. आटपाडी तालुक्यातील खुद्द आटपाडी गावातील हजारो जनतेला दूषित पाणी प्यावे लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणाबरोबरच १६ गावांतील २० पाण्याचे नमुने दूषित आहेत. आटपाडी तालुक्यातील ४३ गावांपैकी २७ गावातील टीसीएल पावडरचे नमुनेही निकृष्ट आढळले आहेत. टीसीएल पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण ३० टक्के गरजेचे असताना, ते त्यापेक्षा कमी आढळून आले आहे. येथील ग्रामपंचायतींना टीसीएलचे प्रमाण जादा वापरण्याच्या जिल्हा परिषदेकडून सूचना दिल्या आहेत.
मिरज तालुक्यातील माधवनगर, हरिपूर, बुधगाव, नांद्रेसह वीस गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. तसेच मिरज तालुक्यातील १२ गावांतील टीसीएल पावडरचे नमुने घेतले होते. त्यापैकी चार ठिकाणचे टीसीएल पावडरचे नमुने निकृष्ट आढळून आले आहेत. येथेही ग्रामपंचायतींना प्रमाणापेक्षा जादा टीसीएल पावडर वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जत तालुक्यातील १०, कवठेमहांकाळ १५, तासगाव १७, पलूस पाच, वाळवा १२, शिराळा १० आणि खानापूर तालुक्यातील १६ ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. टीसीएल पावडरचे नमुनेही निकृष्ट आढळले आहेत. त्यामुळे जादा प्रमाणात टीसीएल पावडर पाण्यात वापरण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून दिल्या आहेत. कडेगाव तालुक्यातील एकाही गावामध्ये पाण्याचे दूषित नमुने आढळून आले नाही.
दरम्यान, जिल्ह्यातील काही ग्रामपंचातीकडून वारंवार दुषित पाण्याचा पुरवठा होवूनही त्याकडे जिल्हा परिषद प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यांच्यावर ठोस कारवाई होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
दूषित पाणी नमुने आढळलेली गावे...
आटपाडी तालुका : आटपाडी, मिटकी, पुजारवाडी, देशमुखवाडी, पात्रेवाडी, कौठुळी, कुरूंदवाडी, विभूतवाडी, झरे, घरनिकी, कामत, घानंद, बोंबेवाडी, लेंगरेवाडी, करगणी, माळेवाडी, जत : लोहगांव, हळ्ळी, उटगी, उमदी, बेळोंडगी, बालगांव, कवठेमहांकाळ : आगळगांव, आरेवाडी, ढालगांव, अलकुड एस, कोकळे, बसप्पावाडी, धुळगांव, जायगव्हाण, मळणगांव, शिरढोण, लांडगेवाडी, मिरज : गुंडेवाडी, कदमवाडी, खंडेराजुरी, नांद्रे, कर्नाळ, माधवनगर, हरिपूर, बेळंकी, बुधगावं, बिसूर, काकडवाडी, बेडग, तासगाव : सावर्डे, वासुंबे, बलगवडे, पेड, नरसेवाडी, नागेवाडी, सावळज, पलूस : दुधोंडी, दह्यारी, तुपारी, सुर्यगांव, हजारवाडी, वाळवा : कोरेगांव, फाणेवाडी, येडेनिपाणी, भडकंबे, वाळवा, शिरगांव, जुनेखेड, बावची. शिराळा : आरळा, कणदूर, चिखली, भाटशिरगांव, शिरसटवाडी, शेडगेवाडी, बिळाशी, मांगरूळ. खानापूर : पारे, वाझर, आळसंद, कळंबी, लेंगरे, भेंडवडे, साळशिंगे, करंजे.

Web Title: Contaminated water in 83 villages in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.