पावसाची संततधार कायम, सांगलीत कृष्णेची पातळी १८ फुटांवर

By अविनाश कोळी | Published: July 21, 2024 07:06 PM2024-07-21T19:06:40+5:302024-07-21T19:07:03+5:30

अलमट्टीतून दीड लाख क्युसेकने विसर्ग

Continuous rain, Krishna level in Sangli at 18 feet | पावसाची संततधार कायम, सांगलीत कृष्णेची पातळी १८ फुटांवर

पावसाची संततधार कायम, सांगलीत कृष्णेची पातळी १८ फुटांवर

सांगली: जिल्ह्यात तसेच धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कायम असून कृष्णा नदीच्या पाणीपातळी वाढ झाली आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सांगलीतील नदीपातळी १८ फुटांवर गेली होती. अलमट्टी धरणातील विसर्गही आता दीड लाखाने सुरू करण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. अधून-मधून विश्रांती घेत रविवारी जिल्ह्यात दिवसभर पावसाची हजेरी होती. दुसरीकडे कोयना व वारणा धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कायम आहे. नदीच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस कायम आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत गेल्या दोन दिवसांत मोठी वाढ झाली आहे. शनिवारी पंधरा फुटांवर असलेली पाणीपातळी रविवारी १८ फुटांवर गेली आहे. पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वारणा धरणातून दीड हजारावर क्युसेकने विसर्ग सुरू असून काही ठिकाणी वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे.

जिल्ह्यातील पाऊस रविवारी सकाळी ८ पर्यंत
मिरज ७.९
जत २
खानापूर ३.७
इस्लामपूर २२.१
तासगाव ५.६
शिराळा ३४.४
आटपाडी १.४
क. महांकाळ २.५
पलूस १२.२
कडेगाव ५.७

Web Title: Continuous rain, Krishna level in Sangli at 18 feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.