शिराळा तालुक्यातील कंत्राटी परिचारिका पगारापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:27 AM2021-01-08T05:27:25+5:302021-01-08T05:27:25+5:30
सहा सप्टेंबर रोजी प्रांताधिकारी यांच्या आदेशाने शिराळा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटरसाठी १९ परिचारकांची, तर दहा शिपायांची तात्पुरती नेमणूक ...
सहा सप्टेंबर रोजी प्रांताधिकारी यांच्या आदेशाने शिराळा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटरसाठी १९ परिचारकांची, तर दहा शिपायांची तात्पुरती नेमणूक केली होती. परिचारिकांना वीस ते सतरा हजार रुपये, तर शिपायांसाठी बारा हजार रुपये इतेक तात्पुरत्या स्वरूपात मानधन देण्यात येणार होते. कोविड सेंटर सध्या बंद झाली असून, गेल्या तीन महिन्यांचा पगार अद्यापही दिला नाही. याबाबत संबंधित उमेदवारांनी जिल्ह्याचे शल्यचिकित्सक संजय साळुंखे यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांच्याकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. प्रांताधिकारी यांच्या आदेशाने या नेमणुका असल्यामुळे महसूल प्रशासनाकडून चालढकल सुरू आहे. संबंधित सर्व कर्मचाऱ्यांनी कोविड काळात पीपीई कीट न वापरतासुद्धा सेवा दिली आहे. स्वतःच्या जिवाची आणि कुटुंबाचीही पर्वा न करता या लोकांनी सेवा दिली आहे. पगार न मिळाल्यास या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.