विट्यात कोरोना काळात पालिका कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:43 AM2021-05-05T04:43:33+5:302021-05-05T04:43:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : कोरोना संसर्गात विटा नगरपरिषदेचे सर्वच कर्मचारी युद्धपातळीवर चांगले काम करीत आहेत. जिवाची बाजी लावून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : कोरोना संसर्गात विटा नगरपरिषदेचे सर्वच कर्मचारी युद्धपातळीवर चांगले काम करीत आहेत. जिवाची बाजी लावून काम केल्याने त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केले.
येथे सोमवारी कामगार दिनाचे औचित्य साधून नगरपालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यावतीने फराळाचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, स्वच्छ सर्वेक्षण अभियानात विटा नगरपालिका गेल्या तीन वर्षांपासून देशात अव्वल ठरत आहे. त्यात कर्मचाऱ्यांचे परिश्रम आहे. सध्या कोरोना काळातही कर्मचारी जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस काम करीत आहेत. कर्मचारी कुटुंबातीलच सदस्य असल्याचे आम्ही मानतो.
नगरसेवक संजय तारळेकर, फिरोज तांबोळी, राहुल घोरपडे, भरत कांबळे, राजेंद्र शितोळे, प्रकाश गायकवाड, आनंदा सावंत, अनिल पवार उपस्थित होते.