समाज घडविण्यात शिक्षकांचे योगदान मोलाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:33 AM2021-09-09T04:33:29+5:302021-09-09T04:33:29+5:30
इस्लामपूर : समाज व विद्यार्थी घडविण्यात शिक्षकांचे योगदान मोलाचे आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी जलसंपदा मंत्री ...
इस्लामपूर : समाज व विद्यार्थी घडविण्यात शिक्षकांचे योगदान मोलाचे आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात मॉडेल स्कूल उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात पालक, ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पंचायत समिती सभापती शुभांगी पाटील यांनी केले.
येथील राष्ट्रवादी भवनमध्ये जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, पश्चिम महाराष्ट्र संघटक छाया पाटील, तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
सुस्मिता जाधव म्हणाल्या, आमच्या अनेक भगिनी शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे काम करीत असताना सार्वजनिक क्षेत्रातही योगदान देत आहेत. अशा आमच्या भगिनींचा सन्मान करण्याची परंपरा निर्माण केली आहे.
छाया पाटील, सुनीता देशमाने, प्राचार्या दीपा देशपांडे, निवृत्त मुख्याध्यापिका उषा मोरे, माजी सभापती सुवर्णा जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्या सुनीता वाकळे या शिक्षिकांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राचार्या दीपा देशपांडे, उषा मोरे, सुवर्णा जाधव, सुनीता वाकळे, मनीषा पाटील, प्रतिभा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
राजश्री गिरीगोसावी यांनी स्वागत केले. अलका माने, रेखा पवार, स्वाती कदम, सविता कदम, वैशाली पाटील, अलका शहा, शैलजा जाधव, पुष्पलता खरात, अंकिता पाटील, प्रियांका साळुंखे, मनीषा पेठकर यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
फोटो : ०८ इस्लामपुर ३
ओळी : इस्लामपूर येथे शिक्षिका उषा मोरे-पंडित यांचा सत्कार शुभांगी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुस्मिता जाधव, छाया पाटील, सुनीता देशमाने, सुवर्णा जाधव, सुनीता वाकळे, दीपा देशपांडे उपस्थित होत्या.