जिल्ह्यातील १६८0 कर्जदारांवर जप्ती!
By admin | Published: February 9, 2016 12:06 AM2016-02-09T00:06:14+5:302016-02-09T00:17:10+5:30
जिल्हा मध्यवर्ती बँक : वसुलीसाठी कायदेशीर कारवाईच्या हालचाली सुरू
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थकित कर्जदारांपैकी पहिल्या टप्प्यात १६८0 कर्जदारांवर कायदेशीर कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या कर्जदारांकडे एकूण ९ कोटी ५२ लाख रुपये कर्ज थकित आहे. कर्ज वसुली प्रमाणपत्र मिळताच जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६0 मधील कलम १0१ नुसार कारवाई करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील जवळपास पन्नास हजार कर्जदारांकडे २३८ कोटीचे कर्ज थकित आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १६८0 कर्जदारांवर कारवाईच्या हालचाली सुरू आहेत. या कर्जदारांवर जप्तीची व तत्सम कारवाई करता यावी म्हणून कर्ज वसुली प्रमाणपत्र मिळविण्यात येत आहेत. त्यानंतर कारवाईचे अधिकार संबंधित तालुक्यातील वसुली अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात येणार आहेत. त्यानंतर सुरुवातीला जप्तीपूर्वच्या व नंतर जप्तीच्या नोटिसा देऊन प्रत्यक्ष जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
द्राक्षे, डाळिंब, ऊस आदी पिकांसाठी प्रामुख्याने अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या कर्जदारांचा थकबाकीदारांमध्ये समावेश आहे. २00९ पासून कर्ज थकित असल्याने आता ही कारवाई केली जाणार आहे. एकीकडे कारवाईच्या हालचाली सुरू असताना, जिल्ह्यातील सर्वच कर्जदारांना बँकेने पैसे भरण्याचे आवाहन केले आहे. वेळेत कर्ज परतफेड केल्यानंतर व्याजदरात सवलत मिळून संबंधित कर्जदारांचाच फायदा होणार आहे. त्यामुळे कर्जदारांनी व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा आणि होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
तालुका सभासदथकबाकी
शिराळा ९५९ ३,0१,00,000
वाळवा३,७१६१३,४६,६९,000
मिरज ३,८८0१७,६८,११,000
कवठेमहांकाळ ३९४३१२,६३,४१,000
जत १२,0६२६८,४९,३२,000
तासगाव ४१0८२४,६७,00,000
खानापूर ८६६२,९९,00,000
आटपाडी १८५८६,0४,00,000
पलूस१५७८७,९१,00,000
कडेगाव८७२३,७२,१३,000
कारवाई होणारे कर्जदार
तालुका सभासदथकबाकी
शिराळा ४६१२,३७,000
कवठेमहांकाळ ८१५ ३,६0,0८,000
जत ६९४५,२७,0६,000
आटपाडी १३५५३,३१,000