बोरगावात सहकार, संस्थापकाची काटा लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:21 AM2021-06-04T04:21:32+5:302021-06-04T04:21:32+5:30

रयत पॅनेलचे इच्छुक उमेदवार विलास शिंदे यांचा अर्ज अवैध ठरला आहे. त्यामुळे ‘रयत’कडे आता तगडा उमेदवार उरला नाही. सहकार ...

Cooperation in Borgaon, fighting the thorn of the founder | बोरगावात सहकार, संस्थापकाची काटा लढत

बोरगावात सहकार, संस्थापकाची काटा लढत

Next

रयत पॅनेलचे इच्छुक उमेदवार विलास शिंदे यांचा अर्ज अवैध ठरला आहे. त्यामुळे ‘रयत’कडे आता तगडा उमेदवार उरला नाही. सहकार पॅनेलकडून जितेंद्र पाटील यांचा एकमेव असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित आहे. संस्थापक पॅनेलकडून माजी संचालक उदयसिंह शिंदे व मानाजी पाटील यांच्यातील तिढा कायम आहे. दोघांनाही माघार मान्य नाही‌. अविनाश मोहिते यांनी उमेदवारीचा चेंडू या दोघांबरोबर गावातील प्रमुखांवर सोपविला आहे. या इच्छुकांनी संपर्कदौऱ्यांच्या आजअखेर तीन-तीन फेऱ्या पूर्ण केल्या आहेत.

रेठरे हरणाक्षमध्ये उलट चित्र दिसते. इच्छुकांची तोबा गर्दी आहे. सहकार पॅनलचे जे. डी. मोरे, संस्थापक पॅनेलचे केदार शिंदे, रयत पॅनेलचे विश्वास ऊर्फ दिलीप मोरे हे तिघेही उमेदवारी फायनल समजून सभासद गाठीभेटींत व्यस्त झाले आहेत.

उमेदवारीचे चित्र १७ जूनला स्पष्ट होणार असले तरी बोरगाव व रेठरे हरणाक्षमधील इच्छुकांनी उमेदवारी निश्चित समजून घरात जाऊन गाठीभेटीवर भर दिला आहे.

बोरगावात कोणालाही उमेदवारी मिळाली तरी बंड होणार नाही; पण रेठरे हरणाक्षमध्ये तिन्ही पॅनेलमधून नाराजी निश्चित समजली जाते.

Web Title: Cooperation in Borgaon, fighting the thorn of the founder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.