सांगली, साताऱ्यात सहकार। संस्थापक पॅनेल थेट संपर्कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:26 AM2021-01-08T05:26:12+5:302021-01-08T05:26:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कृष्णा कारखान्याचे रणांगण काही महिन्यांवर येऊन ठेपले आहे. कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या निवडणुकीचे वारे आता ...

Cooperation in Sangli, Satara. In direct contact with the founder panel | सांगली, साताऱ्यात सहकार। संस्थापक पॅनेल थेट संपर्कात

सांगली, साताऱ्यात सहकार। संस्थापक पॅनेल थेट संपर्कात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कृष्णा कारखान्याचे रणांगण काही महिन्यांवर येऊन ठेपले आहे. कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहे. संस्थापक पॅनेलचे प्रमुख अविनाश मोहिते एकटे लढण्याच्या तयारीत आहेत. सत्ताधारी सहकार पॅनेलकडून डॉ. अतुल भोसले यांनी बैठका सुरू केल्या आहेत; तर रयत पॅनेलचे डॉ. इंद्रजित मोहिते घरीच राहून सोशल मीडियावर विरोधकांना लक्ष्य करत आहेत.

‘कृष्णा’चे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले भाजपचे असले तरी वाळवा तालुक्यात त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादीच्या संचालकांची ताकद आहे. ही ताकद जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या इशाऱ्यावर चालते. कोरोनाच्या काळात कृष्णा मेडिकल ट्रस्टच्या कामांमुळे सहकार पॅनेलची ताकद वाढली आहे. त्यांना शह देण्यासाठी संस्थापक पॅनेलचे प्रमुख अविनाश मोहिते, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या ताकदीवर सभासदांशी संपर्क साधत आहेत. काही निवडणुकांत जयंत पाटील यांची भूमिका गुलदस्त्यात राहिली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांची काय भूमिका असेल, हे कोणीच सांगू शकत नाही.

रयत पॅनेलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यासोबत असलेले ‘कृष्णा’चे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांनी डॉ. सुरेश भोसले यांच्याशी तडजोड केली आहे. त्यामुळे डॉ. इंद्रजित मोहिते स्वबळावर लढणार आहेत. त्यांच्या पाठीशी पतंगराव कदम यांच्या घराण्याची ताकद आहे. इंद्रजित मोहिते व्यवसायाने डॉक्टर असल्याने त्यांनी कोरोनाचा धसका घेतला आहे. त्यामुळे त्यांनी सभासदांच्या थेट संपर्कात न जाता सोशल मीडियावर ‘कृष्णा’च्या इतिहासाची उजळणी सुरू केली आहे. यामध्ये सत्ताधारी सहकार आणि संस्थापक पॅनेलना लक्ष्य केले आहे.

चौकट

आकडेमोडीवर चर्चा

इंद्रजित मोहितेंची आकडेमोड

डॉ. इंद्रजित मोहिते सोशल मीडियावरून कारखान्याच्या नफा-तोटा अंदाजपत्रकावर सभासदांना मार्गदर्शन करतात; परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या एका संस्थेत चाललेल्या ‘आकडेमोडी’वर मात्र त्यांचे लक्ष नसल्याची चर्चा सभासदांतून आहे.

फोटो ०४०१२०२१ -आयएसएलएम-कृष्णा कारखाना न्यूज डॉ. सुरेश भोसले, डॉ. इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते

Web Title: Cooperation in Sangli, Satara. In direct contact with the founder panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.