जिल्ह्यात १०९९ जणांना कोरोना; २५ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:20 AM2021-07-18T04:20:09+5:302021-07-18T04:20:09+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना १०९९ नवे रुग्ण आढळले. दिवसभरात परजिल्ह्यातील चाैघांसह जिल्ह्यातील २१ अशा २५ ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना १०९९ नवे रुग्ण आढळले. दिवसभरात परजिल्ह्यातील चाैघांसह जिल्ह्यातील २१ अशा २५ जणांचा मृत्यू झाला. ७५६ जण कोरोनामुक्त झाले तर म्युकरमायकोसिसने दोघांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातील २१ जणांचा मृत्यू झाला असून त्यात सांगली ४, मिरज, कुपवाड प्रत्येकी १, तासगाव, जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यात प्रत्येकी ३, वाळवा २, खानापूर, पलूस, शिराळा आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
शनिवारी आरोग्य विभागाने आरटीपीसीआर अंतर्गत ३८१२ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ३७६ जण बाधित आढळले तर रॅपिड अँटिजनच्या ९७०० जणांच्या तपासणीतून ७४३ जण पॉझिटिव्ह आढळले.
उपचार घेत असलेल्या १० हजार ५०७ जणांपैकी १०४० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ८७७ जण ऑक्सिजनवर तर १६३ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील चौघांचा मृत्यू झाला तर २० नवे रुग्ण उपचारास दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १६३५३६
उपचार घेत असलेले १०५०७
कोरोनामुक्त झालेले १४८६५३
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४३७६
पॉझिटिव्हिटी रेट ९.८६
शनिवारी दिवसभरात
सांगली १४१
मिरज ३९
आटपाडी ८४
कडेगाव ६१
खानापूर ७९
पलूस ६७
तासगाव ५७
जत ११९
कवठेमहांकाळ ६१
मिरज तालुका १३७
शिराळा ३७
वाळवा २१७