जिल्ह्यात ११२६ जणांना कोरोना; १५८९ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:26 AM2021-05-24T04:26:19+5:302021-05-24T04:26:19+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील स्थिरता कायम राहिली आहे. रविवारी दिवसभरात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढले असून ११२६ जणांना ...

Corona to 1126 people in the district; 1589 freed from corona | जिल्ह्यात ११२६ जणांना कोरोना; १५८९ जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात ११२६ जणांना कोरोना; १५८९ जण कोरोनामुक्त

googlenewsNext

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील स्थिरता कायम राहिली आहे. रविवारी दिवसभरात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढले असून ११२६ जणांना निदान झाले, तर १५८९ जण कोरोनामु्क्त झाले आहेत. परजिल्ह्यातील ५ जणांसह जिल्ह्यातील २४ जणांचा मृत्यू झाला आहे. वाळवा तालुक्यात सर्वाधिक २०९ रुग्णांची नोंद झाली आहे.

आठवडाभरापासून रुग्णांची संख्या स्थिर असून त्यात रविवारी पुन्हा घट झाली. शिवाय बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील २४ जणांचा मृत्यू झाला असून त्यात वाळवा तालुक्यातील ६, खानापूर, जत, मिरज तालुक्यातील प्रत्येकी ४, तासगाव २, तर आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ आणि पलूस तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. दीड महिन्यानंतर प्रथमच महापालिका क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद न झाल्याने दिलासा मिळाला आहे.

आरोग्य विभागाने रविवारी आरटीपीआरअंतर्गत २५०९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ५७० जण बाधित आढळले आहेत, तर रॅपिड ॲन्टिजनच्या २७३८ जणांच्या तपासणीतून ६२४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

विविध रुग्णालयांसह होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या १३ हजार ३८० रुग्णांपैकी २२३० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात १९२८ जण ऑक्सिजनवर, तर ३०१ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील ५ जणांचा मृत्यू झाला असून नवे ६८ रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १०९४२४

उपचार घेत असलेले १३३८०

कोरोनामुक्त झालेले ९२८७२

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३१७२

रविवारी दिवसभरात...

सांगली ९९

मिरज ६८

वाळवा २०९

जत १४८

मिरज तालुका १२०

शिराळा ९८

कडेगाव ९५

तासगाव ८०

कवठेमहांकाळ ६४

खानापूर ५९

आटपाडी ५७

पलूस २९

Web Title: Corona to 1126 people in the district; 1589 freed from corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.