जिल्ह्यात १,२१८ जणांना कोरोना ; ३९ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:21 AM2021-05-29T04:21:44+5:302021-05-29T04:21:44+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत शुक्रवारी पुन्हा वाढ झाली. दिवसभरात १,२१८ जणांना कोरोनाचे निदान होतानाच १,२५६ जण कोरोनामुक्त ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत शुक्रवारी पुन्हा वाढ झाली. दिवसभरात १,२१८ जणांना कोरोनाचे निदान होतानाच १,२५६ जण कोरोनामुक्त झाल्याने दिलासा मिळाला आहे. तरीही कोरोनाने मृत्यूची वाढती संख्या अद्यापही कायम आहे. परजिल्ह्यातील तिघांसह जिल्ह्यातील ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिसचे चार नवे रूग्ण आढळून आले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे.
गुरूवारी हजारावर आलेल्या रूग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली मात्र, बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील ३६ जणांचा मृत्यू झाला असून त्यात सांगली ६, मिरज १, जत तालुक्यात ११, वाळवा ९, तासगाव ३, खानापूर, मिरज तालुक्यात प्रत्येकी २, आटपाडी व कवठेमहांकाळ प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाने शुक्रवारी आरटीपीसीआर अंतर्गत २,६५२ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ६१३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर रॅपिड ॲंटिजन ४,३६९ जणांच्या तपासणीतून ६५६ जण बाधित आढळले आहेत.
उपचार घेत असलेल्या १२ हजार ७१५ जणांपैकी १,९१४ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यातील १,६६९ ऑक्सिजनवर तर २४५ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू तर ५१ नवे रूग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १,१५,४३६
उपचार घेत असलेले १२,७१५
कोरोनामुक्त झालेले ९९,३८४
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३,३३७
शुक्रवारी दिवसभरात
सांगली ११८
मिरज ३३
वाळवा १९४
शिराळा १४८
मिरज तालुका १४०
कडेगाव १२७
तासगाव १११
जत ९२
खानापूर ८१
कवठेमहांकाळ ७७
पलूस ७०
आटपाडी २७
चौकट
म्युकरमायकोसिसचे चार नवे रूग्ण
जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे चार नवे रूग्ण शुक्रवारी आढळले तर उपचार घेत असलेल्यांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या ११४ झाली आहे.