जिल्ह्यात १३०४ जणांना कोरोना; ४५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:28 AM2021-05-21T04:28:15+5:302021-05-21T04:28:15+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची स्थिर असली तरी मृतांची वाढती संख्या गुरुवारीही कायम राहिली. दिवसभरात १३०४ जणांना कोरोनाचे निदान झाले, ...

Corona to 1304 people in the district; 45 killed | जिल्ह्यात १३०४ जणांना कोरोना; ४५ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात १३०४ जणांना कोरोना; ४५ जणांचा मृत्यू

googlenewsNext

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची स्थिर असली तरी मृतांची वाढती संख्या गुरुवारीही कायम राहिली. दिवसभरात १३०४ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर परजिल्ह्यातील ११ जणांसह जिल्ह्यातील ३४ जणांचा मृत्यू झाला. १२९१ जण कोरोनामुक्त झाल्याने दिलासा मिळाला आहे.

गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील बाधितांची संख्या सरासरी १३०० वर स्थिर आहे. गुरुवारी ३४ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली ४, मिरज २, खानापूर ७, मिरज ५, वाळवा ४, तासगाव, जत प्रत्येकी ३, कवठेमहांकाळ, शिराळा तालुक्यातील प्रत्येकी २, तर आटपाडी, पलूस तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल १३ हजार ८५३ जणांपैकी २३१८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील २०३० जण ऑक्सिजनवर, तर २८८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

आरोग्य यंत्रणेने गुरुवारी आरटीपीसीआरअंतर्गत २०७३ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ४५६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ३८५५ जणांच्या नमुने तपासणीतून ९०३ जण बाधित आढळले आहेत. परजिल्ह्यातील ११ जणांचा मृत्यू झाला असून, नवे ५५ जण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १,०५,५११

उपचार घेत असलेले १३,८५३

कोरोनामुक्त झालेले ८८,५७८

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३०८०

गुरुवारी दिवसभरात

सांगली ६९

मिरज ६५

वाळवा २१३

तासगाव १८९

जत १५८

मिरज तालुका १२५

खानापूर ११७

कडेगाव १०३

कवठेमहांकाळ ९०

आटपाडी ८५

शिराळा ६२

पलूस २८

Web Title: Corona to 1304 people in the district; 45 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.