जिल्ह्यात १३३८ जणांना कोरोना; ३९ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:28 AM2021-05-11T04:28:49+5:302021-05-11T04:28:49+5:30
सांगली : जिल्ह्यात सलग दुसऱ्यादिवशी कोरोनासंख्येत घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. सोमवारी दिवसभरात १३३८ जणांना कोरोनाचे निदान होतानाच परजिल्ह्यातील ...
सांगली : जिल्ह्यात सलग दुसऱ्यादिवशी कोरोनासंख्येत घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. सोमवारी दिवसभरात १३३८ जणांना कोरोनाचे निदान होतानाच परजिल्ह्यातील नऊजणांसह जिल्ह्यातील ३० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यूची संख्याही घटली आहे. १२८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सलग दुसऱ्यादिवशी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे, तर सरासरी चाळीसवर असलेल्या मृत्यूसंख्येतही घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. सोमवारी ३० जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली, मिरज प्रत्येकी २, वाळवा तालुक्यात १२, खानापूर तालुक्यात ४, जत, तासगाव प्रत्येकी ३, कवठेमहांकाळ, मिरज, शिराळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
आरोग्य विभागाने सोमवारी आरटीपीसीआरअंतर्गत १६४८ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ४५८ जण बाधित आढळले आहेत, तर ३३५२ जणांच्या तपासणीतून ९२२ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १६ हजार ९९२ वर पाेहोचली असून, त्यातील २६०२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २३०९ जण ऑक्सिजनवर, तर २९३ व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
परजिल्ह्यातील नऊजणांचा मृत्यू झाला असून, सोमवारी ४२ जण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ९२०९२
उपचार घेत असलेले १६९९२
कोरोनामुक्त झालेले ७२४२२
आतापर्यंतचे एकूण मृत्यू २६७८
सोमवारी दिवसभरात
सांगली ८४
मिरज ४५
जत २९७
मिरज तालुका १७३
वाळवा १४९
खानापूर १४४
आटपाडी ९४
तासगाव ८७
कडेगाव ८१
कवठेमहांकाळ ७८
शिराळा ५८
पलूस ४८